Gold Prices Rise: आरबीआयच्या निर्णयामुळं सोनं आणखी तापणार? होणार विक्रमी वाढ, तज्ञ सांगताय...

सोन्याचे भाव विक्रमी उच्चांक गाठू शकतात
Gold Prices Rise
Gold Prices RiseEsakal
Updated on

Gold Prices Rise: जर तुम्ही येत्या काही दिवसांत सोने खरेदी करण्याचा किंवा त्यात गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल, तर त्याच्याशी संबंधित महत्त्वाची माहिती जाणून घ्या. कारण रिझर्व्ह बँकेच्या निर्णयाचा सोन्याच्या किंमतींवर परिणाम होणार आहे.

भविष्यात सोन्याचे भाव विक्रमी उच्चांक गाठू शकतात, असा अंदाजही तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. आरबीआयने 2000 रुपयांच्या नोटा मागे घेण्याची घोषणा केली आहे. या अंतर्गत नोटा बदलण्यासाठी 23 मे ते 30 सप्टेंबर 2023 पर्यंतची वेळ देण्यात आली आहे.

सोन्याचा भाव 63,000 रुपयांवर जाणार:

कमोडिटी मार्केट तज्ज्ञ आणि आयआयएफएल सिक्युरिटीजचे उपाध्यक्ष अनुज गुप्ता यांनी सांगितले की, आरबीआयच्या नोटा रद्द करण्याच्या निर्णयामुळे सोन्याच्या किंमतीत मोठा बदल झाला आहे. किंमती विक्रमी पातळीवर पोहोचतील असा अंदाज आहे.

ते पुढे म्हणाले की, बाजारात सोन्याची किंमत 62,000 ते 63,000 रुपये प्रति 10 ग्रॅमपर्यंत पोहोचू शकते. कारण 2000 रुपयांच्या चलनावर बंदी आणून लोक ते खर्च करण्याचा प्रयत्न करतील. 2016 मध्ये नोटाबंदीच्या वेळीही असे दिसून आले होते.

Gold Prices Rise
Unclaimed Money: RBI बचत आणि चालू खात्याबाबत बदलणार नियम; 1 जूनपासून होणार मोठे बदल, बँक करणार...

सोन्याच्या प्रीमियम किंमतीत वाढ:

ते म्हणाले की ज्या खरेदीदारांकडे 2000 रुपयांची नोट आहे त्यांनी ती बँकेत जमा करण्याऐवजी किंवा ती बदलून घेण्याऐवजी त्यांना सोने खरेदी करायला आवडेल.

यामुळे सोन्याची मागणी वाढणार आहे. खरेदीदार प्रत्यक्ष बाजारपेठेत प्रीमियम देऊनही सोने खरेदी करण्यास तयार असतो. मागणी वाढल्यामुळे प्रीमियमची किंमतही 1500-2000 रुपये झाली आहे, जी पूर्वी 1000 रुपये होती.

सोन्याचे भाव वाढले:

काल देशांतर्गत बाजारात सोन्याच्या किंमतीत मोठा चढ उतार दिसून आला. एमसीएक्सवर सोन्याचा भाव 667 ते 60390 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​पोहोचला आहे. चांदीच्या दरातही वाढ झाली आहे, चांदी 1200 रुपयांनी महागली आहे.

Gold Prices Rise
Fatty Liver Disease: संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.