नवी दिल्ली : केंद्र आणि राज्य सरकारांनी ऑगस्टमध्ये वस्तू आणि सेवा कराद्वारे १.५९ लाख कोटी रुपये महसूल गोळा केला आहे. गेल्या वर्षीच्या याच महिन्यातील करसंकलनाच्या तुलनेत त्यात ११ टक्के वाढ झाली आहे.
ऑगस्ट २०२२ मध्ये १.४३ लाख कोटी रुपये जीएसटी जमा झाला होता. गेल्या महिन्याच्या तुलनेत जीएसटी संकलनात घट झाली असून, जुलैमध्ये १.६५ लाख कोटी रुपये करसंकलन झाले होते. सलग तिसऱ्या महिन्यात जीएसटी संकलन एक लाख ६० कोटी रुपयांच्या आसपास आहे.
जुलैच्या तुलनेत ऑगस्टमधील जीएसटी महसुलाने केंद्र सरकारचा जीएसटी (सीजीएसटी), राज्यांचा जीएसटी (एसजीएसटी) आणि आयात व आयजीएसटीद्वारे संकलित केलेला कर कमी आहे.
या आर्थिक वर्षात, एप्रिलमध्ये आतापर्यंतचा सर्वाधिक १.८७ लाख कोटी रुपये इतका जीएसटी महसूल गोळा झाला होता, त्यानंतर जुलैमध्ये दुसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक करसंकलन झाले होते. वस्तूंच्या आयातीतून मिळणारा महसूल ऑगस्टमध्ये वार्षिक तीन टक्के जास्त होता, तर देशांतर्गत व्यवहारातून (सेवांच्या आयातीसह) महसूल १४ टक्के जास्त होता.
महाराष्ट्राने नोंदविली २३ टक्के वाढ
उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात आणि तमिळनाडू या प्रमुख राज्यांच्या अर्थव्यवस्थांनी जीएसटी संकलनात दुहेरी अंकी वार्षिक वाढ नोंदवली आहे. ऑगस्टमध्ये महाराष्ट्राच्या जीएसटी महसुलात २३ टक्के वाढ होऊन तो २३,२८२ कोटी रुपये झाला आहे, तर कर्नाटकच्या महसुलात १६ टक्के वाढ होऊन तो ११,११६ कोटी झाला आहे.
गुजरातमध्ये १२ टक्के वाढीसह ९७६५ कोटी रुपये संकलन झाले आहे, असे अधिकृत आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. महसुलातील स्थिर वाढ केवळ ग्राहकांच्या मागणीतील वाढ दर्शवत नाही, तर भांडवली खर्चाला चालना देण्यासाठी सरकारचे प्रयत्नदेखील अधोरेखित करते.
यामुळे खासगी गुंतवणुकीला प्रोत्साहन मिळत आहे. असे असले तरी, कमी मान्सून, वाढलेली चलनवाढ आणि उच्च व्याजदर यासारख्या घटकांमुळे भविष्यात वाढ कमी होण्याची शक्यता आहे, असे तज्ज्ञांनी म्हटले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.