Airtel : २० लाख मुंबईकर एअरटेलच्या 5जी नेटवर्कवर

देशातील आघाडीच्या टेलिकम्युनिकेशन्स सेवा पुरवठादारांपैकी एक असलेल्या भारती एअरटेल (एअरटेल) ने मुंबईत आपल्या 5जी नेटवर्कवर २० लक्ष ग्राहकांचा टप्पा पार केला आहे.
Airtel 5g network
Airtel 5g networkSakal
Updated on
Summary

देशातील आघाडीच्या टेलिकम्युनिकेशन्स सेवा पुरवठादारांपैकी एक असलेल्या भारती एअरटेल (एअरटेल) ने मुंबईत आपल्या 5जी नेटवर्कवर २० लक्ष ग्राहकांचा टप्पा पार केला आहे.

मुंबई - देशातील आघाडीच्या टेलिकम्युनिकेशन्स सेवा पुरवठादारांपैकी एक असलेल्या भारती एअरटेल (एअरटेल) ने मुंबईत आपल्या 5जी नेटवर्कवर २० लक्ष ग्राहकांचा टप्पा पार केला आहे. ही सेवा सुरू केल्यापासून केवळ 7 महिन्यांत हा टप्पा पार केला आहे. शहरातील सर्व भागात 5जी सेवा असणारे मुंबई हे पहिले शहर आहे. मुंबई, नवी मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, मीरा-भाईंदर व शहरातील सर्व भागात आता 5जी सेवा उपलब्ध आहे.

भारती एअरटेलचे मुख्य कार्यकारी अधिकारी विभोर गुप्ता म्हणाले की, मुंबईमध्ये 5जी सेवेचा आनंद २० लाखांहून अधिक ग्राहक घेत आहेत, ही आनंदाची बाब आहे. शहरातील सर्व ठिकाणी 5जी चा विस्तार केला असून आमच्यावर विश्‍वास दाखविल्याबद्दल सर्व ग्राहकांचे आम्ही आभारी आहोत व 5जी चा अखंड अनुभव घेण्यासाठी जोडले गेलेल्या नवीन ग्राहकांचे आम्ही स्वागत करतो.

५ जी मुंबईत सर्वत्र उपलब्ध

एअरटेल 5जी प्लस बीकेसी,नरिमन पॉईंट आणि लोअर परळ सारख्या सर्व महत्त्वाच्या व्यावसायिक ठिकाणांमध्ये उपलब्ध आहे. ही सेवा छत्रपती शिवाजी टर्मिनस (सीएसटी), मुंबई मेट्रो लाईन, मुंबई मोनो रेल आणि पश्‍चिम, मध्य व हार्बर लाईन्सवरील सर्व रेल्वे स्थानकामध्ये उपलब्ध असून दररोज प्रवास करणार्‍या ग्राहकांना अखंड नेटवर्कचा अनुभव मिळेल.

याशिवाय गेट वे ऑफ इंडिया, मरिन ड्राईव्ह, कुलाबा कॉजवे, बांद्रा-वरळी सी लिंक, जुहू बीच व शहरातील इतर पर्यटन व लोकप्रिय ठिकाणी जलद 5जी सेवेचा आनंद ग्राहकांना घेता येईल. निवासी स्थळे तसेच मुंबई विद्यापीठ,आयआयटी मुंबई आणि टीआयएसएस सारख्या शैक्षणिक परिसराच्या ठिकाणी देखील ही सेवा उपलब्ध आहे.

देशभरात साडेतीन हजार शहरात सेवा

एअरटेल 5जी सेवा आता देशभरातील 3500 हून अधिक शहरांमध्ये उपलब्ध आहे. कंपनीने नुकताच देशभरात 5जी नेटवर्कवर १ कोटी ग्राहकांचा टप्पा पार केला आहे. सप्टेंबर 2023 पर्यंत प्रत्येक शहरी व महत्त्त्वाच्या ग्रामीण भागात 5जी सेवेचा विस्तार करण्यास सज्ज आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.