Reserve Bank of India: पुन्हा एकदा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 2000 रुपयांच्या नोटेबाबत नवीन माहिती शेअर केली आहे. आरबीआयने आतापर्यंत बँकेत परत आलेल्या नोटांची माहिती दिली आहे. याशिवाय लोकांकडे आजही उपलब्ध असलेल्या नोटांचीही माहिती देण्यात आली आहे.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने सोमवारी (1 जुलै 2024) सांगितले की 2,000 रुपयांच्या 97.87 टक्के नोटा बँकांमध्ये परत आल्या आहेत. चलनातून काढून टाकण्यात आलेल्या 7,581 कोटी रुपयांच्या नोटा अजूनही लोकांकडे आहेत. RBI ने 19 मे 2023 रोजी चलनातून 2000 रुपयांच्या नोटा चलनातून काढून घेण्याची घोषणा केली होती.
19 मे 2023 रोजी चलनात असलेल्या 2000 रुपये बँक नोटांचे एकूण मूल्य 3.56 लाख कोटी होते. 28 जून 2024 रोजी ते 7,581 कोटी रुपयांवर घसरले. “अशा प्रकारे, 28 जून 2024 पर्यंत, 2,000 रुपयांच्या नोटांपैकी 97.87 टक्के नोटा बँकांकडे परत आल्या आहेत,” असे केंद्रीय बँकेने एका निवेदनात म्हटले आहे.
7 ऑक्टोबर 2023 पर्यंत देशातील सर्व बँक शाखांमध्ये 2000 रुपयांची नोट जमा करण्याची किंवा बदलण्याची सुविधा उपलब्ध होती. 19 मे 2023 पासून रिझर्व्ह बँकेच्या 19 ऑफिसमध्ये 2000 रुपयांच्या नोटा बदलण्याची सुविधा उपलब्ध आहे.
RBI कार्यालये देखील 9 ऑक्टोबर 2023 पासून व्यक्ती आणि संस्थांकडून त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यासाठी 2000 रुपयांच्या नोटा स्वीकार आहेत. याशिवाय, लोक त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यासाठी देशातील कोणत्याही पोस्ट ऑफिसमधून 2000 रुपयांच्या नोटा आरबीआयच्या कोणत्याही कार्यालयात पाठवू शकतात.
बँक नोटा जमा/बदली करण्यासाठी 19 RBI कार्यालये अहमदाबाद, बेंगळुरू, बेलापूर, भोपाळ, भुवनेश्वर, चंदीगड, चेन्नई, गुवाहाटी, हैदराबाद, जयपूर, जम्मू, कानपूर, कोलकाता, लखनौ, मुंबई, नागपूर, नवी दिल्ली, पाटणा आणि तिरुअनंतपुरम येथे आहेत. आहेत. नोव्हेंबर 2016 मध्ये 1000 आणि 500 रुपयांच्या नोटा काढून टाकल्यानंतर 2000 रुपयांच्या नोटा चलनात आल्या होत्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.