IPO Open : 235 कोटीचा प्लॅटिनम इंडस्ट्रीजचा आयपीओ 27 फेब्रुवारीला खुला होणार, तुम्ही तयार आहात का ?

मुंबईस्थित स्टॅबिलायझर उत्पादक कंपनी प्लॅटिनम इंडस्ट्रीजचा आयपीओ (Platinum Industries) 27 फेब्रुवारीला सुरू होणार आहे.
IPO Open
IPO Opensakal
Updated on

मुंबईस्थित स्टॅबिलायझर उत्पादक कंपनी प्लॅटिनम इंडस्ट्रीजचा आयपीओ (Platinum Industries) 27 फेब्रुवारीला सुरू होणार आहे. गुंतवणूकदारांना 29 फेब्रुवारीपर्यंत यामध्ये गुंतवणूक करता येईल. त्याच वेळी, 26 फेब्रुवारीला एक दिवसासाठी हा आयपीओ अँकर गुंतवणूकदारांसाठी खुला असेल. या आयपीओअंतर्गत फक्त फ्रेश इक्विटी शेअर्स जारी केले जातील. ऑफर फॉर सेलद्वारे (OFS) कोणतीही विक्री होणार नाही. कंपनीने इश्यूसाठी 162-171 रुपये प्रति शेअर प्राइस बँड ठेवला आहे. आयपीओमधून 235.32 कोटी उभारण्याचा कंपनीचा मानस आहे.

प्लॅटिनम इंडस्ट्रीजमध्ये प्रमोटर्सचे शेअर्स 94.74 टक्के आहेत, तर डॉ हॉर्स्ट मायकल शिलरसह पब्लिक शेअरहोल्डर्सचे 5.26 टक्के शेअर्स आहेत. प्लॅटिनम इंडस्ट्रीजने प्रायव्हेट प्लेसमेंटच्या माध्यमातून 157 रुपये प्रति शेअर या इश्यू प्राइसवर 9,10,700 इक्विटी शेअर्सचे प्री-आयपीओ प्लेसमेंटचे वाटप केले आहे. कृष्णा दुष्यंत राणा आणि पारुल कृष्णा राणा हे कंपनीचे प्रमोटर्स आहेत.

प्लॅटिनम सब्सिडियरी कंपनी प्लॅटिनम स्टॅबिलायझर्स इजिप्त एलएलसी सुएझमधील मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटी उभारण्यासाठी 67.72 कोटी आणि पालघर, महाराष्ट्र इथे पीव्हीसी स्टॅबिलायझर्सच्या मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटी उभारण्यासाठी 71.26 कोटी खर्च करणार आहे. याव्यतिरिक्त, 30 कोटी खेळत्या भांडवलाच्या गरजांसाठी आणि उर्वरित सामान्य कॉर्पोरेट हेतूंसाठी वापरले जातील. आयपीओमधील 50 टक्के पात्र संस्थात्मक खरेदीदारांसाठी (QIB), 35 टक्के गैर-संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी (NII) आणि 15 टक्के रिटेल गुंतवणूकदारांसाठी राखीव आहेत. आयपीओच्या यशानंतर शेअर्सचे वाटप 1 मार्चला होईल. यानंतर, 5 मार्चला बीएसई आणि एनएसईवर शेअर्सची एन्ट्री होईल. आयपीओचे रजिस्ट्रार लिंक इनटाईम आहेत.

IPO Open
Mutual Fund : म्युच्युअल फंड दुपटीने वाढणार ; मालमत्ता १०० लाख कोटींवर जाण्याची अपेक्षा

कंपनी महाराष्ट्रातील पालघरमधील एकाच मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटीतून काम करते. कोणतीही स्थानिक सामाजिक अशांतता किंवा नैसर्गिक आपत्तीचा कंपनीच्या व्यवसायावर परिणाम होऊ शकतो. प्लॅटिनम इंडस्ट्रीज ही पीव्हीसी पाईप्स आणि ट्यूब, पीव्हीसी प्रोफाइल, पीव्हीसी फिटिंग आणि इलेक्ट्रिकल वायर आणि केबल्स यांसारखी उत्पादने वापरणाऱ्या कंपन्याच्या डिमांडवर अवलंबून आहे. अशा उद्योगातील कोणतीही मंदी कंपनीच्या व्यवसायाला हानी पोहोचवू शकते.

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा. किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.