पुणे : महाराष्ट्रातील आघाडीचा सराफी ब्रँड असलेल्या पीएनजी सन्सला (पु. ना. गाडगीळ आणि सन्स) कौन्सिल फॉर फेअर बिझनेस प्रॅक्टिस (सीएफबीपी)चा ३६ वा जमनालाल बजाज फेअर बिझनेस प्रॅक्टिस पुरस्कार मिळाला आहे. हा सन्मान मिळविणारा हा महाराष्ट्रातील पहिलाच सराफी ब्रँड ठरला आहे.
मुंबईत झालेल्या सोहळ्यात पीएनजी सन्सचे संस्थापक अध्यक्ष अजित गाडगीळ व कंपनीचे संचालक सीईओ अमित मोडक यांनी हा पुरस्कार उद्योजक शेखर बजाज व ब्रीज कँडीचे डॉ. हेमंत ठाकर यांच्या हस्ते स्वीकारला. पारदर्शी व्यापारवृद्धीसाठी जे. आर. डी. टाटा, रामकृष्ण बजाज यांच्यासह अन्य उद्योजक व व्यावसायिकांनी सीएफबीपीची स्थापना केली. गाडगीळ म्हणाले, ‘
‘या पुरस्कारामुळे आम्ही आजपर्यंत केलेल्या कामाची दखल राष्ट्रीय पातळीवर घेतल्याचा आनंद आहे. गेल्या सहा पिढ्यांपासून आम्ही सराफी व्यवसाय करताना ग्राहकांना उत्तम सेवा, पारदर्शिता, गुणवत्ता देत आहोत.’’ ‘व्यवसाय विस्तार करताना पीएनजी सन्सने कायम गुणवत्ता व पारदर्शितेला प्राधान्य दिले आहे, असे मोडक यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.