HDFC Life Bonus : ‘एचडीएफसी लाइफ’तर्फे ३७२२ कोटींचा बोनस

खासगी क्षेत्रातील आयुर्विमा कंपनी एचडीएफसी लाइफ इन्शुरन्सने सुमारे २२.२३ लाख पॉलिसीधारकांना सहभागी योजनांवर ३७२२ कोटी रुपयांचा सर्वाधिक बोनस जाहीर केला आहे.
HDFC Life Bonus
HDFC Life Bonussakal
Updated on

मुंबई : खासगी क्षेत्रातील आयुर्विमा कंपनी एचडीएफसी लाइफ इन्शुरन्सने सुमारे २२.२३ लाख पॉलिसीधारकांना सहभागी योजनांवर ३७२२ कोटी रुपयांचा सर्वाधिक बोनस जाहीर केला आहे. एकूण बोनस रकमेपैकी, चालू आर्थिक वर्षात मुदतपूर्तीच्या स्वरूपात पॉलिसींना बोनस किंवा रोख बोनस म्हणून २७९८ कोटी वितरित केले जातील, तर उर्वरित बोनस भविष्यात पॉलिसी मॅच्युरिटी, मृत्यू झाल्यास देय असेल.

‘एचडीएफसी लाइफ’च्या व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी विभा पडळकर म्हणाल्या, ‘‘या वर्षी पॉलिसीधारकांसाठी बोनसमध्ये वाढ जाहीर करताना आम्हाला आनंद होत आहे. आयुर्विमा पॉलिसी दीर्घ मुदतीच्या आहेत आणि बोनस पॉलिसीधारकांच्या संपूर्ण पॉलिसी कालावधीत निष्ठेसाठी बक्षीस म्हणून काम करतात. आम्ही आमच्या पॉलिसीधारकांना सर्वोत्कृष्ट उत्पादने आणि सेवा प्रदान करण्यासाठी वचनबद्ध आहोत.’’

‘एचडीएफसी लाइफ’ने ३१ मार्च २०२४ रोजी संपलेल्या तिमाहीत निव्वळ नफ्यात वार्षिक १४.७ टक्के वाढ नोंदवून ४११.६६ कोटी रुपयांचा नफा मिळवला आहे. मागील वर्षीच्या याच कालावधीत तो ३५८ कोटी रुपये होता. एप्रिल २०२४ मध्ये कंपनीने नव्या व्यवसाय प्रीमियममध्ये ४.३१ टक्के वाढ नोंदवली असून, ती १५७५ कोटी रुपयांवर पोहोचली आहे. मागील वर्षीच्या याच कालावधीत ती १५१० कोटी रुपये होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.