Foreign Investment : थेट परकी गुंतवणुकीत ४३ टक्के घसरण

देशातील थेट परकी गुंतवणुकीचा ओघ (एफडीआय) वर्ष २०२३ मध्ये ४३ टक्क्यांनी घसरून २८ अब्ज डॉलरवर आला असून, भारताचे स्थान २०२२ मधील आठव्या स्थानावरून १५ व्या स्थानावर घसरले आहे, अशी माहिती युनायटेड नेशन्स कॉन्फरन्स ऑन ट्रेड अँड डेव्हलपमेंटच्या (यूएनसीटीएडी) अहवालात देण्यात आली आहे.
Foreign Investment
Foreign Investmentsakal
Updated on

नवी दिल्ली : देशातील थेट परकी गुंतवणुकीचा ओघ (एफडीआय) वर्ष २०२३ मध्ये ४३ टक्क्यांनी घसरून २८ अब्ज डॉलरवर आला असून, भारताचे स्थान २०२२ मधील आठव्या स्थानावरून १५ व्या स्थानावर घसरले आहे, अशी माहिती युनायटेड नेशन्स कॉन्फरन्स ऑन ट्रेड अँड डेव्हलपमेंटच्या (यूएनसीटीएडी) अहवालात देण्यात आली आहे. भारतातील थेट परकी गुंतवणुकीचा ओघ २०२२ मध्ये वार्षिक दहा टक्क्यांनी वाढून ४९ अब्ज डॉलर झाला होता.

आता वर्ष २०२४ मध्ये थेट परकी गुंतवणुकीची शक्यता आव्हानात्मक असली तरी, संपूर्ण वर्षासाठी माफक वाढ शक्य आहे, असेही या अहवालात म्हटले आहे. गुंतवणूक सुलभीकरणासाठी राष्ट्रीय धोरणे आणि आंतरराष्ट्रीय करार या प्रयत्नांमुळे आणि आर्थिक वाढीमुळे परकी गुंतवणुकीत माफक वाढ होईल, असे यात नमूद करण्यात आले आहे.

थेट परकी गुंतवणूक ग्रीनफिल्ड प्रकल्प आणि आंतरराष्ट्रीय प्रकल्पांसाठी भारताचे स्थान पहिल्या पाच देशांमध्ये आहे. ग्रीनफील्ड प्रकल्पांसाठी २०२२ मध्ये तिसरा सर्वांत मोठा यजमान देश असलेला भारत २०२३ मध्ये एक स्थान घसरून चौथ्या स्थानावर आला आहे, तर आंतरराष्ट्रीय प्रकल्प सौद्यांमध्ये तो दुसऱ्या क्रमांकावर राहिला आहे. थेट परकी गुंतवणूक बाहेर जाण्याच्या बाबतीत, भारत २०२२ मधील २३ व्या क्रमांकावरून २०२३ मध्ये विसाव्या क्रमांकावर आला असून, जगातील २० सर्वोत्तम यजमान अर्थव्यवस्थांमध्ये, परकी गुंतवणुकीतील सर्वांत मोठी घट फ्रान्स, ऑस्ट्रेलिया, चीन, अमेरिका आणि भारतामध्ये नोंदवली गेली आहे, असेही या अहवालात स्पष्ट केले आहे.

विकसित देशांना बहुराष्ट्रीय उद्योगांच्या नफ्यावर जागतिक किमान कर दर लागू करण्याच्या प्रयत्नांमुळे जोरदार फटका बसला आहे. विकसनशील आशियाई देशांमधील थेट परकी गुंतवणूक आठ टक्क्यांनी घसरून ६२१ अब्ज डॉलरवर आली आहे. भारतात आणि पश्चिम व मध्य आशियामध्ये मोठ्या प्रमाणात घट नोंदवली गेली. चीन जगातील दुसऱ्या क्रमांकाचा परकी गुंतवणूक प्राप्त करणारा देश आहे. भारताने परदेशी विधिसंस्थांना "देशात परदेशी कायद्याचा सराव" करण्याची परवानगी दिली आहे. या क्षेत्रातील धोरणात्मक दृष्टिकोनाचा अवलंब करून, शाश्वत वित्तविषयक राष्ट्रीय धोरणे किंवा आराखडा तयार करणाऱ्या देशांपैकी भारत एक आहे. बांगलादेश, चीन, सिंगापूर आणि थायलंडसह भारताने बँकिंग उद्योगाच्या शाश्वत विकासासाठी एकत्रित करण्यासाठी, शाश्वत ठेवी, शाश्वत कर्जे आणि ग्रीन क्रेडिट समाविष्ट करण्यासाठी अनुकूल धोरणे जारी केली आहेत, असेही अहवालात नमूद करण्यात आले आहे.

परकी गुंतवणुकीचा ओघ

देश

(कंसात आधीचा क्र.) २०२२

(अब्ज डॉलर) २०२३

(अब्ज डॉलर)

१) अमेरिका (१) ३३२ ३११

२) चीन(२) १८९ १६३

३) सिंगापूर (३) १४१ १६०

४) हाँगकाँग (४) ११० ११३

५) ब्राझील (६) ७३ ६६

६) कॅनडा (९) ४६ ५०

७) फ्रान्स (५) ७६ ४२

८) जर्मनी (१७) २७ ३७

९) मेक्सिको (१२) ३६ ३६

१०) स्पेन (१०) ४५ ३६

१५) भारत (८) ४९ २८

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.