Chandrayaan-3: 615 कोटींच्या चांद्रयानातून 31 हजार कोटींची कमाई, कोणी भरली एवढी तिजोरी?

Chandrayaan-3: भारताने केवळ 615 कोटी रुपयांमध्ये ते कसे यशस्वी केले याचे आश्चर्य अनेक देशांना आहे.
615 crores chandrayaan create rs 31 thousand crores money know how
615 crores chandrayaan create rs 31 thousand crores money know howSakal
Updated on

Chandrayaan-3: भारताच्या चांद्रयान 3 मोहिमेच्या यशाने संपूर्ण जग थक्क झाले आहे, परंतु भारतासारख्या देशाने केवळ 615 कोटी रुपयांमध्ये ते कसे यशस्वी केले याचे आश्चर्य अनेक देशांना आहे. भारत असा देश आहे जिथे चित्रपटांच्या निर्मितीचा खर्च चांद्रयान 3 च्या बजेटपेक्षा दुप्पट आहे.

दुसरीकडे, शेअर बाजारातील गुंतवणूकदार अशा सर्व शेअर्समध्ये हजारो कोटी रुपयांची गुंतवणूक करत आहेत ज्यांचा एरोस्पेसशी संबंध आहे. आठवड्याच्या पहिल्या चार दिवसांत, 13 स्पेस-आधारित शेअर्सच्या एकत्रित मार्केट कॅपमध्ये 31 हजार कोटी रुपयांची वाढ झाली आहे.

'या' कंपन्यांचे शेअर्स वाढले

चांद्रयान-3 साठी ISRO ला प्रमुख मॉड्यूल्स आणि सिस्टम पुरवणाऱ्या सेंटम इलेक्ट्रॉनिक्सच्या स्मॉलकॅप कंपनीच्या शेअर्समध्ये या आठवड्यात 26 टक्क्यांनी वाढ झाली आहे. या आठवड्यात अवांटेल, लिंडे इंडिया, पारस डिफेन्स आणि भारत हेवी इलेक्ट्रिकल्सच्या शेअर्समध्येही दुहेरी अंकी वाढ झाली.

दुसरीकडे, गोदरेज इंडस्ट्रीजच्या शेअर्समध्ये 8 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. लोकांचा असा विश्वास आहे की गोदरेज एरोस्पेस, जी इस्रोला साहित्य पुरवठा करते, ही त्याची उपकंपनी आहे. कंपनीने नंतर स्पष्ट केले की गोदरेज एरोस्पेस ही गोदरेज इंडस्ट्रीजची कंपनी नाही.

615 crores chandrayaan create rs 31 thousand crores money know how
Hindenburg 2.0: मोठ्या कॉर्पोरेट घराण्यांवर येणार संकट? OCCRP हिंडेनबर्गसारखा अहवाल आणण्याच्या तयारीत

'या' कंपन्यांचेही महत्त्वाचे योगदान होते

भारताला चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा पहिला देश बनण्यात भूमिका बजावणाऱ्या कंपन्यांची यादी मोठी आहे. लार्सन अँड टुब्रो (L&T) चंद्र मोहिमेमध्ये प्रणालीच्या निर्मितीपासून ते मिशन ट्रॅकिंगपर्यंत सामील होते. पारसने चांद्रयान-3 साठी नेव्हिगेशन सिस्टीमचा पुरवठा केला तर PSU BHEL ने टायटॅनियम टँक आणि बॅटरीचा पुरवठा केला.

अंतराळ आणि संरक्षण शेअर्स फोकसमध्ये का आहेत?

यापैकी अनेक भारतीय कंपन्या 447 अब्ज डॉलरच्या जागतिक अवकाश बाजारपेठेत जगाचे लक्ष वेधून घेऊ शकतात. गगनयान, आदित्य L1, EXPOSAT, NISAR आणि Spadex सारख्या ISRO च्या इतर आगामी मोहिमांकडे लक्ष वेधून SAMCO सिक्युरिटीजचे अपूर्व शेठ म्हणाले की, स्पेस आणि डिफेन्स शेअर्स हा एक मोठा ट्रेंड आहे ज्याकडे गुंतवणूकदारांनी येत्या काही वर्षात लक्ष ठेवावे.

615 crores chandrayaan create rs 31 thousand crores money know how
Gold Investment: अमेरिका आणि चीनची अर्थव्यवस्था मंदीत मात्र सोने खरेदीत तेजीत! असं का घडतंय?

तज्ञ काय म्हणतात?

स्टॉकबॉक्सचे संशोधन प्रमुख मनीष चौधरी म्हणाले की, चांद्रयान-3 मोहिमेच्या यशामुळे एलअँडटी, एचएएल, बीईएल आणि एमटीएआर टेक्नॉलॉजीज यांसारख्या कंपन्यांसाठी एरोस्पेस, संरक्षण आणि दूरसंचार (सॅटेलाइट कम्युनिकेशन) यासारख्या विविध क्षेत्रांचे दरवाजे उघडतील.

मिशनमुळे मिळालेल्या यशानंतर, यापैकी अनेक कंपन्यांनी आता जागतिक गुंतवणूकदारांचे लक्ष वेधून घेतले आहे.

नोंद: क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.