Mutual Funds : नव्या योजनांद्वारे ६६ हजार कोटींची भर ; म्युच्युअल फंडात आर्थिक वर्ष २०२४ मध्ये ६.५ टक्के वाढ

देशातील म्युच्युअल फंड कंपन्यांनी आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये दाखल केलेल्या १८५ नव्या योजनांद्वारे ६६,३६४ कोटी रुपयांची गुंतवणूक मिळवली आहे. आर्थिक वर्ष २०२२-२३च्या तुलनेत त्यात ६.५ टक्के वाढ झाली आहे. वर्ष २०२२-२३ मध्ये २५३ योजनांद्वारे ६२,३४२ कोटी रुपये जमा झाले होते.
Mutual Funds
Mutual Fundssakal
Updated on

मुंबई : देशातील म्युच्युअल फंड कंपन्यांनी आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये दाखल केलेल्या १८५ नव्या योजनांद्वारे ६६,३६४ कोटी रुपयांची गुंतवणूक मिळवली आहे. आर्थिक वर्ष २०२२-२३च्या तुलनेत त्यात ६.५ टक्के वाढ झाली आहे. वर्ष २०२२-२३ मध्ये २५३ योजनांद्वारे ६२,३४२ कोटी रुपये जमा झाले होते. म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीकडे छोट्या गुंतवणूकदारांचा वाढता कल आणि व्यापक बाजारपेठेतील लक्षणीय वाढ यामुळे हे साध्य झाल्याचे ‘फायर्स रिसर्च’च्या अभ्यास अहवालात म्हटले आहे.

‘फायर्स’च्या अहवालानुसार, जानेवारी ते मार्च २०२४ या कालावधीत ६३ नव्या योजना (एनएफओ) दाखल झाल्या आणि त्याद्वारे एकूण २२,६८३ कोटी रुपयांच्या निधी जमा झाला. त्याआधीच्या ऑक्टोबर ते डिसेंबर २०२३ या तिमाही कालावधीत, ४९ योजना दाखल झाल्या होत्या आणि त्यांनी १६,०९३ कोटी रुपये मिळवले. शेअर बाजार तेजीत असतात, तेव्हा गुंतवणूकदारही आशावादी असतात.

गुंतवणूकदारांच्या या सकारात्मक मनःस्थितीचा लाभ घेण्यासाठी आणि त्यांना गुंतवणूक करण्याकरिता आकर्षित करण्यासाठी म्युच्युअल फंड कंपन्या नव्या योजना (एनएफओ) आणतात. आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये भारतीय शेअर बाजारांनी लक्षणीय कामगिरी बजावली, त्यामुळे गुंतवणूकदारांमध्येही उत्साह होता. आर्थिक वर्ष २०२४ मध्ये निर्देशांकांनी विक्रमी कामगिरी केली आणि गुंतवणूकदारांना २८.६ टक्के परतावा दिला. त्यामुळे या कालावधीत आणलेल्या योजनांना प्रतिसाद मिळाला आणि त्याद्वारे अधिक निधी जमा झाला, असे या अहवालात म्हटले आहे.

Mutual Funds
Share Market Today: यूएस बाँड उत्पन्नात वाढ झाल्यामुळे शेअर बाजारावर दबाव; आज कशी असेल बाजाराची स्थिती?

आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांनी दोन लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक गुंतवणूक शेअर बाजारात केली. छोट्या गुंतवणूकदारांनीही सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनद्वारे (एसआयपी) त्याला पाठींबा दिला. एप्रिल २०२३ मध्ये दरमहा १३,७२० कोटी रुपये गुंतवणूक झाली होती, ती मार्च २०२४ पर्यंत १९,२७० कोटी रुपयांपर्यंत वाढली.

म्युच्युअल फंडांनी आणलेल्या नव्या योजनांच्या तीन मुख्य श्रेणींपैकी, हायब्रीड फंडांमधून आर्थिक वर्ष २०२३ मध्ये १८, ८१३ कोटी रुपये काढून घेण्यात आले होते, त्यात आर्थिक वर्ष २०२४ मध्ये १.४५ लाख कोटींची भर पडली. इक्विटी फंडांच्या नव्या योजनांनी १.८४ लाख कोटी मिळवले, मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत त्यात २५.४ टक्क्यांनी वाढ झाली.

गुंतवणूकदारांनी व्याजदरवाढीच्या चक्रात विराम मिळण्याची अपेक्षा केल्यामुळे आणि त्यांची गुंतवणूक डेट फंडातून काढून इक्विटी आणि हायब्रिड फंडांकडे वळवली, त्यामुळे डेट फंडातून मोठी गुंतवणूक काढून घेण्यात आली, असेही या अहवालात म्हटले आहे. सध्या देशात बचतीचे आर्थिकीकरण सुरू आहे.

उत्पन्न आणि खर्चाच्या पातळीत सातत्याने वाढ होत असल्याने, संपत्ती निर्माण करण्यासाठी उच्च परतावा देणाऱ्या पर्यायांमध्ये गुंतवणूक करण्याबाबत जागरुकता वाढत असल्‍याचे या वाढत्या गुंतवणुकीवरून दिसून येत आहे, असे फायर्स रिसर्चने आपल्या अभ्यास अहवालात म्हटले आहे. भारताच्या अर्थव्यवस्थेची वाढ वेगाने होत असल्याने आणि गुंतवणुकीच्या संधींचा विस्तार होत आहे. त्यामुळे अनेक नोंदणीबद्ध नसलेल्या कंपन्या भांडवली बाजारात उतरत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.