7th Pay Commission DA Hike: देशभरातील एक कोटींहून अधिक केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारक गुड न्यूजची वाट पाहत आहेत, ती लवकरच मिळण्याची शक्यता आहे. महागाई भत्त्यात (डीए) वाढ होण्याची वाट पाहणाऱ्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना लवकरच आनंदाची बातमी मिळू शकते.
पुढील महिन्यात डीए वाढीची घोषणा होऊ शकते, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. सप्टेंबरमध्ये महागाई भत्त्यात वाढ करण्याची घोषणा केली जाऊ शकते. केवळ डीएच नाही तर जुलै आणि ऑगस्ट महिन्यांची थकबाकीही मिळू शकते.