Bharat Heavy Electricals Ltd : भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेडला एनटीपीसीकडून 9,500 कोटीची ऑर्डर, 4 वर्षात 895% परतावा...

भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेडने त्यांच्या शेअरहोल्डर्सना कायम मल्टीबॅगर परतावा दिला आहे. आता कंपनीला एनटीपीसीकडून 9,500 कोटीची नवीन ऑर्डर मिळाली आहे.
9500 crore order from NTPC to Bharat Heavy Electricals Ltd 895 percent return in 4 years
9500 crore order from NTPC to Bharat Heavy Electricals Ltd 895 percent return in 4 yearsSakal
Updated on

Bharat Heavy Electricals Ltd : भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेडने त्यांच्या शेअरहोल्डर्सना कायम मल्टीबॅगर परतावा दिला आहे. आता कंपनीला एनटीपीसीकडून 9,500 कोटीची नवीन ऑर्डर मिळाली आहे. गेल्या गुरुवारी कंपनीच्या शेअर्समध्ये 0.88 टक्क्यांची किंचित वाढ दिसून आली आणि शेअर 257.45 रुपयांवर बंद झाला.

या वाढीसह कंपनीचे मार्केट कॅप 89 हजार कोटींच्या पुढे गेले आहे. स्टॉकचा 52 आठवड्यांचा उच्चांक 271.90 रुपये आहे आणि 52 आठवड्यांचा नीचांक 67.63 रुपये आहे. कंपनीकडे एकूण 1,14,425 कोटीची ऑर्डर बुक आहे. एलआयसीची कंपनीत 9.62 टक्के भागीदारी आहे.

भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेडला उत्तर प्रदेशातील सोनभद्र जिल्ह्यात सिंगरौली सुपर थर्मल पॉवर प्रकल्पाचा टप्पा-III (2x800 MW) उभारण्यासाठी एनटीपीसी लिमिटेडकडून 9500 कोटीपेक्षा जास्त किमतीची ऑर्डर मिळाली आहे.

यात इंजिनिअरिंग, प्रोक्योअरमेंट आणि कंस्ट्रक्शन (EPC) कॉन्ट्रॅक्टद्वारे कार्यान्वित करेल. यामध्ये बांधकाम, कमिशनिंग आणि सिविल वर्क्स तसेच बॉयलर, टर्बाइन आणि जनरेटर यांसारख्या इक्विपमेंट्सच्या सप्लायचा समावेश आहे.

कंपनीला गेल्या महिन्यात हरयाणा पॉवर जनरेशन कॉर्पोरेशन लिमिटेडकडून ऑर्डरही मिळाली होती. भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेडला एचपीजीसीएलकडून हरयाणातील यमुनानगरच्या दीन बंधू छोटू राम थर्मल पॉवर प्लांट (DCRTPP) इथे नवीन 800 मेगावॅट अल्ट्रा सुपर क्रिटिकल एक्स्पेन्शन युनिट बांधण्याचे कंत्राट मिळाले आहे. हा काँट्रॅक्ट 5,500 कोटीपेक्षा जास्त आहे.

गेल्या एका महिन्यात बीएचईएलचे शेअर्स 19 टक्क्यांनी वाढले आहेत. त्याच वेळी, गेल्या 6 महिन्यांत 84 टक्के उत्कृष्ट परतावा दिला आहे. या वर्षी आतापर्यंत शेअर 30 टक्क्यांनी वाढला आहे. त्याच वेळी, त्याच्या गुंतवणूकदारांनी गेल्या एका वर्षात 246 टक्के नफा कमावला आहे. गेल्या 4 वर्षात, स्टॉकने 895 टक्के बंपर नफा कमावला आहे.

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा. किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.