विजबिलाच्या नावाखाली ९८ हजार रुपयांचा झटका

परदेशी असलेल्या मुलांच्या आईला एका चोरट्याने आपले विजेचे बिल भरलेले नाही, असा ‘एसएमएस’ केला आणि रात्रीत वीज तोडली जाईल
98 thousand rupees fraud  of electricity bill cyber crime
98 thousand rupees fraud of electricity bill cyber crime esakal
Updated on

- शिरीष देशपांडे

परदेशी असलेल्या मुलांच्या आईला एका चोरट्याने आपले विजेचे बिल भरलेले नाही, असा ‘एसएमएस’ केला आणि रात्रीत वीज तोडली जाईल, असे सांगितले. वीज तोडायला नको असेल, तर त्वरित खालील नंबरला फोन करा, असेही सांगितले. त्यानुसार, त्या महिलेने फोन केल्यानंतर, तिच्या बँक खात्यातून ९८ हजार रुपये गायब झाले होते.

हे कसे घडले?

या महिलेला वीजबिल भरलेले नाही, असा मेसेज आल्यावर त्यांनी दिलेल्या नंबरला फोन केला आणि सांगितले, की मी दोन हजार रुपये महिन्यापूर्वीच भरले आहेत आणि आम्ही नेहमीच आगाऊ बिल भरतो.

त्यावर चोरट्याने सांगितले, की आमचा सर्व्हर डाऊन असल्याने ते पैसे दिसत नाहीत. तुम्ही आता परत दोन हजार रुपये भरा; सर्व्हर सुरू झाला, की आधीचे आणि आताचेही पैसे जमा होतील. त्यामुळे तुम्हाला पुढील दोन महिने काळजी नको.

त्यानंतर त्याने लिंक पाठवली आणि माहिती भरावयास सांगितले. पुढच्या पाचच मिनिटांत त्या महिलेच्या बँक खात्यातून ९८,००० रुपये गेलेले होते. त्यांच्या मुलीने एका दिवसात खात्याला रुपये एक लाख रुपयांची मर्यादा घातली होती, त्यादिवशी दोन हजार रुपये आधीच दुसऱ्या कारणासाठी वापरले गेलेे होते, त्यामुळे चोरटे ९८ हजार रुपयेच लुबाडू शकले.

बँकेचा मेसेज येताक्षणीच त्या महिलेच्या लक्षात आले, की फसवणूक झाली आहे. त्यांनी ताबडतोब बँकेत फोन करून खाते ब्लॉक करून टाकले.

ही काळजी घ्या

  • आपली वीज तोडू असा मेसेज किंवा फोन आला, की एक मिनिट थांबा विचार करा आणि अजिबात घाबरू नका.

  • ‘एमएसईबी’ कधीही वीज तोडू, असे मेसेज किंवा फोन करत नाही.

  • कोणत्याही अनोळखी माणसाचे फोन घेऊ नका, अनोळखी मेसेजला उत्तर देऊ नका.

  • फोन आल्यास फोन करणाऱ्या व्यक्तीला कोणते बिल भरायचे राहिले आहे त्याचा तपशील देण्यास सांगा, त्याच्याकडे काहीच माहिती नसेल, तर नक्कीच तो भामटा आहे हे समजा.

  • नेहमी भरपूर प्रश्न विचारा, जेणेकरून तुमचे समाधान होईल. त्यानंतर खात्री पटली, तर जवळच्या ‘एमएसईबी’ केंद्रामध्ये येऊन पैसे भरते, असे सांगा आणि खरेच जाऊन आपले बिल राहिले असेल, खात्री करा. तिथले अधिकारी तुम्हाला सर्वतोपरी मदत करतील.

  • पैशाची मागणी आली, की धोका आहे असे समजा. बँकेत खाते नसेल, तर कोपऱ्यावर रोख पैसे घेऊन या, असे सांगतात व खोटी पावती देतात, असेही ऐकिवात आले आहे. ‘एमएसईबी’ आपल्या अधिकृत ऑफिसमध्येच रोख किंवा चेक घेते, हे लक्षात असू द्या.

  • आपल्या बँक खात्याला आर्थिक व्यवहारांसाठी एक मर्यादा लावा.

चूक घडली, तर काय करावे ?

असे काही झालेच, तर ताबडतोब बँक खाते तात्पुरते लॉक करा.

https://cybercrime.gov.in या संकेतस्थळावर तक्रार नोंदवा.

त्वरित १९३० /१५५२६० या क्रमांकावर संपर्क साधा. ही यंत्रणा तातडीने योग्य ती कार्यवाही करेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.