NDA Cabinet Ministers: भारतात नवीन सरकार स्थापन झाले असून एनडीए सरकारच्या पहिल्या कॅबिनेट बैठकीनंतर काही मोठे निर्णयही जाहीर करण्यात आले आहेत. नवीन मंत्र्यांनीही त्यांच्या मंत्रिपदाचा कार्यभार स्वीकारला आहे आणि आता ते सरकारचा 100 दिवसांचा अजेंडा पुढे नेण्यासाठी काम करत आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी त्यांच्या 71 मंत्र्यांसह शपथ घेतली. यावेळी भाजपला स्वबळावर बहुमत मिळालेले नाही. त्यामुळे मोदी राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे नेतृत्व करत आहेत.
असोसिएशन ऑफ डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (ADR) या देशातील निवडणूक सुधारणांच्या दिशेने काम करणाऱ्या संस्थेच्या मते, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील नवीन मंत्रिमंडळातील 71 सदस्यांपैकी 70 म्हणजे 99 टक्के मंत्री करोडपती आहेत आणि त्यांची सरासरी संपत्ती 107.94 कोटी रुपये आहे. एडीआरने सांगितले की, 100 कोटी रुपयांपेक्षा जास्त संपत्ती असलेले सहा मंत्री आहेत. एडीआरने मंत्र्यांनी केलेल्या संपत्तीच्या घोषणेच्या आधारे हे मूल्यांकन केले आहे.
जवळपास 99 टक्के नवीन मंत्री करोडपती आहेत. विश्लेषण केलेल्या 71 मंत्र्यांपैकी 70 मंत्र्यांनी मालमत्ता जाहीर केली आहे. या मंत्र्यांचा आर्थिक तपशील प्रदान करणाऱ्या अहवालात सरासरी संपत्ती 107.94 कोटी रुपये असल्याचे सूचित होते.
ग्रामीण विकास आणि दळणवळण मंत्रालयाचे राज्यमंत्री डॉ चंद्रशेखर पेम्मासानी यांची एकूण संपत्ती 5705.47 कोटी रुपये आहे. त्यांच्या मालमत्तेत 5,598.65 कोटी रुपयांची जंगम मालमत्ता आणि 106.82 कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता समाविष्ट आहे.
दळणवळण मंत्री ज्योतिरादित्य एम सिंधिया यांनी एकूण 424.75 कोटी रुपयांची संपत्ती जाहीर केली आहे. त्यांच्या संपत्तीच्या तपशिलांमध्ये 362.17 कोटी रुपयांची जंगम मालमत्ता आहे.
जनता दल (Secular) चे अवजड उद्योग मंत्री आणि पोलाद मंत्री एचडी कुमारस्वामी यांची एकूण संपत्ती 217.23 कोटी रुपये आहे. त्यांच्या मालमत्तेत 102.24 कोटी रुपयांची जंगम मालमत्ता आणि 115.00 कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता समाविष्ट आहे.
रेल्वे मंत्री, माहिती आणि प्रसारण मंत्री आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी एकूण 144.12 कोटी रुपयांची मालमत्ता घोषित केली आहे, ज्यात 142.40 कोटी रुपयांची जंगम मालमत्ता आणि 1.72 कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता समाविष्ट आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.