Export of Gems and Jewellery : रत्ने आणि दागिन्यांच्या निर्यातीत घट;एप्रिलमध्ये आयातीत ३.९५ टक्क्यांची अल्प वाढ

देशातून होणारी रत्ने आणि दागिन्यांची निर्यात एप्रिलमध्ये घटली आहे, तर आयातीत किरकोळ वाढ झाली आहे.
Export of Gems and Jewellery : रत्ने आणि दागिन्यांच्या निर्यातीत घट;एप्रिलमध्ये आयातीत ३.९५ टक्क्यांची अल्प वाढ
Updated on

मुबंई : देशातून होणारी रत्ने आणि दागिन्यांची निर्यात एप्रिलमध्ये घटली आहे, तर आयातीत किरकोळ वाढ झाली आहे. जेम्स अँड ज्वेलरी उद्योगाची सर्वोच्च संस्था ‘जीजेईपीसी’ने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, निर्यातीत वार्षिक ११.३७ टक्क्यांनी घट झाली असून, आयात ३.९५ टक्क्यांनी वाढली आहे.

रत्ने आणि दागिन्यांची एकूण आयात १५,७७२ कोटी रुपयांची झाली असून, मागील वर्षीच्या याच कालावधीतील १४,९१९ कोटी रुपयांच्या तुलनेत त्यात अल्प वाढ झाली आहे. देशातील निवडणुकांमुळे मागणी कमी झाली असल्याने आयातही कमी झाली आहे, असे तज्ज्ञांनी म्हटले आहे. एप्रिल २०२४ मध्ये रत्ने आणि दागिन्यांची एकूण निर्यात १७३०७ कोटी रुपयांची झाली होती. गेल्या वर्षीच्या याच कालावधीतील १९१९८ कोटी रुपयांच्या तुलनेत त्यात ११.३७ टकक्यांनी घसरण झाली आहे. जागतिक स्तरावर आर्थिक अनिश्चितता आणि अस्थिरतेमुळे रत्ने आणि दागिन्यांच्या निर्यातीवर परिणाम झाला आहे.

कट आणि पॉलिश हिऱ्यांच्या एकूण निर्यातीत एप्रिल २०२४ मध्ये १६.७६ टक्क्यांनी घसरण झाली. ती ११५३८ कोटी रुपयांच्या तुलनेत ९६३२ कोटी रुपयांवर आली आहे. रफ हिऱ्यांची एकूण आयात एप्रिल २०२४ मध्ये ९९२८ कोटी रुपयांची होती, त्यात मागील वर्षीच्या याच महिन्याच्या तुलनेत १९.२७ टक्क्यांनी घट झाली. एप्रिलमध्ये पॉलिश्ड लॅब ग्रोन हिऱ्यांची निव्वळ निर्यात ६९८ कोटी रुपयांची झाली.

गेल्या वर्षीच्या याच महिन्यातील ८३९ कोटींच्या तुलनेत त्यात १८ टक्क्यांनी घसरण झाली आहे. एप्रिलमध्ये सोन्याच्या दागिन्यांची एकूण निव्वळ निर्यात ५९९१ कोटी रुपयांची असून, मागील वर्षीच्या याच महिन्यातील ५३०४ कोटी रुपयांच्या तुलनेत त्यात ११.०३ टक्क्यांनी वाढ झाली आहे. रंगीत रत्नांची निर्यात २०६ कोटींची असून, गेल्या वर्षी याच कालावधीतती ३१४ कोटी रुपयांची होती.

रत्ने आणि दागिने उद्योग गेल्या एक वर्षाहून अधिक काळ विविध आव्हानांना तोंड देत आहे. जागतिक स्तरावरील अस्थिरतेमुळे मागणी कमी झाली आहे, त्यामुळे निर्यातीला मोठा फटका बसला आहे; तसेच यंदा ६० हून अधिक देशांमध्ये निवडणुकीचा हंगाम असल्याने त्याचाही परिणाम आयातीवर झाला आहे. आगामी काळात निर्यात वाढण्याची अपेक्षा आहे.

— कॉलिन शाह,

एमडी, कामा ज्वेलरी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.