Real Estate News : नव्या घरांच्या पुरवठ्यामध्ये घट ; देशातील आठ महानगरांमधील नव्या घरांची संख्या १५ टक्क्यांनी कमी

देशातील आठ महानगरांमधील नव्या घरांच्या पुरवठ्यात जानेवारी ते मार्च या तिमाहीत वार्षिक १५ टक्क्यांनी घट नोंदविण्यात आली आहे. मागणी अधिक असूनही पहिल्या तिमाहीत ६९ हजार १४३ नव्या घरांचा पुरवठा झाला आहे,
Real Estate News
Real Estate Newssakal
Updated on

नवी दिल्ली : देशातील आठ महानगरांमधील नव्या घरांच्या पुरवठ्यात जानेवारी ते मार्च या तिमाहीत वार्षिक १५ टक्क्यांनी घट नोंदविण्यात आली आहे. मागणी अधिक असूनही पहिल्या तिमाहीत ६९ हजार १४३ नव्या घरांचा पुरवठा झाला आहे, अशी माहिती बांधकाम क्षेत्रातील कुशमॅन अँड वेकफिल्ड या सल्लागार संस्थेने आपल्या अहवालात दिली आहे.

कंपनीने देशातील आठ महानगरांतील निवासी मालमत्ता क्षेत्राचा तिमाही अहवाल जाहीर केला आहे. त्यानुसार, गेल्या वर्षातील याच तिमाहीच्या तुलनेत घरांचा पुरवठा १५ टक्क्यांनी कमी आहे. बंगळूर आणि मुंबई या शहरांत नव्या घरांचा पुरवठा वाढला आहे. मात्र, दिल्ली, चेन्नई, हैदराबाद, पुणे, कोलकाता आणि अहमदाबाद या शहरांत घरांच्या पुरवठ्यात घट झाली आहे. पहिल्या तिमाहीत नव्याने सुरू झालेल्या गृहप्रकल्पांपैकी ३४ टक्के प्रकल्प आलिशान घरांचे आहेत, तर नव्या गृहप्रकल्पांमध्ये नोंदणीकृत

Real Estate News
IPO News Update : तुमचं वय 30 वर्ष आहे का? ; मग हा एसआयपी प्लॅन तुमच्यासाठी उत्तम...

आणि मोठ्या विकासकांचे प्रमाण ३८ टक्के आहे, असेही या अहवालात म्हटले आहे. यंदाच्या पहिल्या तिमाहीत ६९ हजार १४३ नव्या घरांचा पुरवठा झाला. गेल्या वर्षी पहिल्या तिमाहीत तो ८१ हजार १६७ होता. बंगळूरमध्ये नव्या घरांचा पुरवठा ७ हजार ७७७ वरून वाढून ८ हजार ८४८ वर पोहोचला आहे. मुंबईतही नव्या घरांचा पुरवठा १९ हजार ६३ वरून १९ हजार ४६१ वर पोहोचला आहे. पुण्यात गेल्या वर्षी नव्या घरांचा पुरवठा १३ हजार ८०६ होता. यंदा पहिल्या तिमाहीत तो ११ हजार ३५८ वर घसरला आहे.

अहमदाबादमध्ये गेल्या वर्षी पहिल्या तिमाहीत नव्या घरांचा पुरवठा ४ हजार ९०१ होता, तो यंदा पहिल्या तिमाहीत ४ हजार ५२९ वर आला आहे. चेन्नईत नव्या घरांचा पुरवठा ८ हजार १४४ वरून ५ हजार ४९० वर आला असून, दिल्लीत तो ७ हजार ८१३ वरून ३ हजार ६१४ पर्यंत कमी झाला आहे, असेही अहवालात नमूद करण्यात आले आहे.

गेल्या वर्षभरापासून आलिशान आणि महागड्या घरांना मागणी वाढत आहे. ग्राहकांचा कल उंची जीवनशैलीकडे वाढत असल्याचे यातून दिसत आहे. आगामी काळात मोठ्या विकासकांकडून आलिशान घरांचे प्रकल्प उभारण्याचे प्रमाण वाढत जाईल.

- शालिन रैना, व्यवस्थापकीय संचालक, कुशमॅन अँड वेकफिल्ड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.