Gautam Adani: हिंडेनबर्ग प्रकरणाला एक वर्ष पूर्ण, अदानी म्हणाले, काल आम्ही तिथे होतो, भविष्यात...

Gautam Adani: एक वर्षापूर्वी आजच्याच दिवशी अमेरिकन शॉर्ट सेलिंग कंपनी हिंडेनबर्ग रिसर्चने अदानी समूहावर एक अहवाल सादर केला होता. यानंतर अदानी समूहाच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली. याशिवाय गौतम अदानी यांच्या संपत्तीतही मोठी घसरण दिसून आली.
A year after Hindenburg report, how Adani Group firm stocks are performing
A year after Hindenburg report, how Adani Group firm stocks are performing Sakal
Updated on

Gautam Adani: एक वर्षापूर्वी आजच्याच दिवशी अमेरिकन शॉर्ट सेलिंग कंपनी हिंडेनबर्ग रिसर्चने अदानी समूहावर एक अहवाल सादर केला होता. यानंतर अदानी समूहाच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली. याशिवाय गौतम अदानी यांच्या संपत्तीतही मोठी घसरण झाली होती.

गौतम अदानी यांनी वर्षभरानंतर हिंडेनबर्ग अहवालावर आपले मत व्यक्त केले आहे. टाईम्स ऑफ इंडियाच्या लिहिलेल्या लेखात, गौतम अदानी म्हणाले की, ''आमच्यावर खोटे आणि निराधार आरोप होणे काही नवीन नाही. मी याबद्दल फारसा विचार केला नाही.'' त्यांनी हिंडेनबर्गच्या अहवालाला राजकीय हल्ला म्हटले आहे.

हिंडेनबर्ग अहवालाचे वर्णन "भयानक हल्ला" असे करताना ते म्हणाले की, यातून एक गोष्ट शिकायला मिळाली. आज आमच्यावर असा हल्ला झाला आणि भविष्यात असा हल्ला दुसऱ्यावरही होण्याची शक्यता आहे.

A year after Hindenburg report, how Adani Group firm stocks are performing
Budget 2024: अंतराळ अर्थव्यवस्था ४४ अब्ज डॉलरपर्यंत वाढण्याचा अंदाज; उदार ‘FDI’ धोरणाची अपेक्षा

त्यांनी लिहिले की, जर विरोधक पूर्णपणे यशस्वी झाले असते, तर बंदरे आणि विमानतळांपासून वीजेपर्यंत अनेक पायाभूत सुविधांची स्थिती बिघडली असती, जी देशासाठी भयावह स्थिती निर्माण होऊ शकली असती.

अशा प्रतिकूल वातावरणातही अदानी आपल्या समूहाला पुन्हा रुळावर आणण्यात काही प्रमाणात यशस्वी झाले आहेत. समूहाच्या 10 कंपन्यांपैकी काही कंपन्यांना नुकसान भरून काढण्यात यश आले आहे. शेअर बाजाराच्या आकडेवारीनुसार, सध्या अदानी समूहाचे एकूण बाजार भांडवल सुमारे 14.52 लाख कोटी रुपये आहे.

A year after Hindenburg report, how Adani Group firm stocks are performing
Ayodha Ram Mandir: श्रीरामामुळे ‘यूपी’ बनणार धनवान; अतिरिक्त महसूल मिळण्याचा अंदाज

हिंडनबर्ग अहवालापूर्वीच्या 19.23 लाख कोटी होते. मागील विक्रमापेक्षा बाजार भांडवल अजूनही 24 टक्के कमी आहे. व्यवसाया व्यतिरिक्त, सर्वोच्च न्यायालयाच्या टिप्पण्यांमुळे समूहाला बाजारपेठेतील कामगिरी सुधारण्यास मदत झाली आहे.

सर्वोच्च न्यायालयाने हिंडेनबर्गचा अहवाल 'विश्वसनीय' मानला जाऊ शकत नाही आणि मीडिया रिपोर्ट्सला 'अंतिम सत्य' मानले जाऊ नये, असे म्हटले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.