Abhyudaya Bank: एका वर्षात अभ्युदय सहकारी बँकेच्या विलफुल डिफॉल्टरची संख्या वाढली तीनपटीने

Abhyudaya Cooperative Bank Crisis: अभ्युदय सहकारी बँक अडचणीत का आली?
Abhyudaya Cooperative Bank's Wilful Defaults Surged Threefold In Just A Year
Abhyudaya Cooperative Bank's Wilful Defaults Surged Threefold In Just A Year eSakal
Updated on

Abhyudaya Cooperative Bank Crisis: गेल्या काही वर्षांत देशातील अनेक सहकारी बँका संकटात सापडल्या आहेत. नुकतेच या यादीत महाराष्ट्रातील अभ्युदय सहकारी बँकेचे नाव समाविष्ट झाले असून त्यावर रिझर्व्ह बँकेने कारवाई केली. अभ्युदय सहकारी बँकेची ढासळलेली स्थिती पाहता रिझर्व्ह बँकेने संचालक मंडळ बरखास्त केले आहे.

विलफुल डिफॉल्ट वाढले

ट्रान्स युनियन सिबिल डेटानुसार, एका वर्षात अभ्युदय कोऑपरेटिव्ह बॅंकेच्या विलफुल डिफॉल्टमध्ये 3 पट वाढ झाली आहे. 31 ऑक्टोबर 2022 पर्यंत, मुंबईस्थित अभ्युदय सहकारी बँकेचे एकूण विलफुल डिफॉल्ट रुपये 132 कोटी होते.

जे एका वर्षात वाढून 416 कोटी रुपये झाले. अभ्युदय सहकारी बँक अडचणीत येण्याचे प्रमुख कारण म्हणजे विलफुल डिफॉल्टमध्ये वाढ झाल्याचे सांगितले जात आहे. (Willful defaults increased)

Abhyudaya Cooperative Bank's Wilful Defaults Surged Threefold In Just A Year
Old Pension Scheme: जुन्या पेन्शन योजनेबाबत RBIचा मोठा इशारा; राज्यांनी आश्वासने...

विलफुल डिफॉल्टच्या रकमेबरोबरच विलफुल डिफॉल्टर्सची संख्याही जवळपास तीन पटीने वाढली आहे. ऑक्टोबर 2022 मध्ये अशा थकबाकीदारांची संख्या केवळ 9 होती, ती वर्षभरात 24 झाली. रिझर्व्ह बँकेच्या आकडेवारीनुसार, या काळात अभ्युदय सहकारी बँकेचे भांडवल देखील घसरले.

रिझर्व्ह बँकेची कारवाई

रिझर्व्ह बँकेने गेल्या महिन्यात अभ्युदय सहकारी बँकेचे संचालक मंडळ पुढील एक वर्षासाठी बरखास्त केले होते. रिझर्व्ह बँकेने म्हटले होते की, बँकेच्या आर्थिक परिस्थितीमुळे अभ्युदय सहकारी बँकेच्या संचालक मंडळाला हटवण्याचा निर्णय घेतला आहे.(Action by the Reserve Bank)

Abhyudaya Cooperative Bank's Wilful Defaults Surged Threefold In Just A Year
Infosys: इन्फोसिस कंपनीचा मोठा निर्णय! वर्क फ्रॉम होम होणार बंद; ऑफिसमध्ये न आल्यास...

स्टेट बँक ऑफ इंडियाचे माजी मुख्य महाव्यवस्थापक सत्य प्रकाश पाठक यांची अभ्युदय सहकारी बँकेच्या प्रशासकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्याशिवाय सल्लागारांची एक समितीही नेमण्यात आली आहे.

विलफुल डिफॉल्टर कोणाला म्हणतात?

अशा कंपन्या किंवा लोक जे कर्ज घेतात पण जाणीवपूर्वक परतफेड करत नाहीत. कर्जाचे हप्ते फेडण्यास सक्षम असूनही ते हप्ते भरत नाहीत त्यांना विलफुल डिफॉल्टर म्हणतात.(Who is called a willful defaulter?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.