Adani Group: पुण्याच्या आयटी हबमध्ये अदानी करणार मोठी गुंतवणूक; 25 एकर जमीन केली खरेदी, काय आहे प्लॅन?

Adani Group: महाराष्ट्राचे औद्योगिक शहर आणि आयटी हब म्हणून पुण्याची ओळख आहे. आता याच पुण्याच्या आयटी हबमध्ये अदानींचे डेटा सेंटरही असेल. अदानी समूहाची कंपनी टेराविस्टा डेव्हलपर्सने यासाठी पुण्यातील हवेली परिसरात 25 एकरहून अधिक जागा घेतली आहे.
Business
Adani GroupSakal
Updated on

Adani Group: महाराष्ट्राचे औद्योगिक शहर आणि आयटी हब म्हणून पुण्याची ओळख आहे. आता याच पुण्याच्या आयटी हबमध्ये अदानींचे डेटा सेंटरही असेल. अदानी समूहाची कंपनी टेराविस्टा डेव्हलपर्सने यासाठी पुण्यातील हवेली परिसरात 25 एकरहून अधिक जागा घेतली आहे.

ही जमीन पिंपरी औद्योगिक क्षेत्रात आहे. ही जमीन फिनोलेक्स इंडस्ट्रीजची होती. या जमिनीचे भाडेपट्ट्याचे अधिकार घेण्यासाठी कंपनीने सुमारे 471 कोटी रुपये खर्च केले आहेत. या जमिनीत डेटा सेंटर विकसित करण्यात येणार आहे. (Adani Group acquires 25 acres from Finolex in Pune to set up data center)

या महिन्याच्या सुरुवातीला जमिनीचा हा व्यवहार झाला. हा करार 3 एप्रिल रोजी नोंदणीकृत झाला आणि समूह कंपनी टेराविस्टा डेव्हलपर्सने त्यासाठी 23.52 कोटी रुपये मुद्रांक शुल्क भरले. खरेदी केलेली जमीन महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने स्वस्तिक रबर प्रोडक्टला भाडेतत्त्वावर दिली होती.

Business
देशातील आठ महानगरांमध्ये यंदा पहिल्या तिमाहीत कार्यालयीन जागांच्या मागणीत वाढ

जगभरात डेटा सेंटर व्यवसाय हा उदयोन्मुख व्यवसाय मानला जातो. अदानी समूहाने या व्यवसायासाठी मोठी योजना तयार केली आहे. यासाठी अदानी समूहाची प्रमुख कंपनी अदानी एंटरप्रायझेसने एजकॉनेक्ससोबत संयुक्त उपक्रम स्थापन केला आहे.

दोघांची JV अदानी कोनेक्समध्ये 50-50 टक्के हिस्सेदारी आहे. ही कंपनी आधीच चेन्नई, नवी मुंबई, नोएडा, विशाखापट्टणम आणि हैदराबाद सारख्या शहरांमध्ये डेटा सेंटर तयार करण्याचे काम करत आहे. JV ने पुढील दशकात 1 गिगावॅट क्षमतेच्या डेटा सेंटरचे नेटवर्क तयार करण्याची योजना आखली आहे.

Business
Ola Cabs: 'ओला'चा मोठा निर्णय! 'या' ठिकाणची सेवा करणार बंद; कर्मचाऱ्यांना पाठवली नोटीस

जागतिक संस्थात्मक गुंतवणूकदार आणि भारतीय कंपन्यांसाठी भारतातील डेटा सेंटर सर्वात आकर्षक वाढीची संधी म्हणून उदयास येत आहेत. डेटा सेंटर मार्केटमध्ये गुंतवणुकीचा प्रवाह येत आहे, ज्यामुळे एकाच वेळी अनेक नवीन बाजारपेठा निर्माण होत आहेत. देशात डेटा सेंटर डेव्हलपमेंटसाठी आतापर्यंत एकूण 13.5 बिलियन डॉलरपेक्षा जास्त गुंतवणुकीची योजना आखण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.