Penna Cement: अदानी समूहाची कंपनी अंबुजा सिमेंट दक्षिण भारतातील पेन्ना सिमेंट इंडस्ट्रीज विकत घेणार आहे. कंपनीने आज 10,422 कोटी रुपयांना कंपनी विकत घेण्याचा निर्णय घेतला आहे. सप्टेंबर 2022 मध्ये सिमेंट व्यवसायात प्रवेश केल्यानंतर अदानी समूहाचे हे तिसरे संपादन आहे.
अंबुजा सिमेंटने सांगितले की, या करारामुळे कंपनीची एकूण उत्पादन क्षमता दरवर्षी 14 दशलक्ष टनांनी वाढेल आणि अदानी समूहाच्या सिमेंट व्यवसायाची एकूण क्षमता 89 दशलक्ष टन प्रतिवर्ष होईल. हा करार तीन ते चार महिन्यांत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.
पेन्ना सिमेंटने 2019 मध्ये प्रारंभिक सार्वजनिक ऑफर (IPO) सुरू करण्याचा प्रयत्न केला होता परंतु तो अयशस्वी झाला. इंडिया रेटिंग्जने या वर्षी जानेवारीमध्ये कंपनीवर लिहिलेल्या नोटमध्ये असे म्हटले होते की पेन्ना सिमेंटला H1FY24 मध्ये 11 कोटी रुपयांचा EBITDA तोटा झाला आहे. महागडा कोळसा आणि कमी कार्यक्षमतेमुळे कंपनीला तोटा सहन करावा लागला होता.
सध्या पेन्ना सिमेंटची एकूण वार्षिक कार्यक्षमता 1 कोटी टन आहे आणि कृष्णपट्टणम आणि जोधपूर येथे प्रत्येकी 20 लाख टन वार्षिक क्षमतेचे दोन कारखाने बांधले जात आहेत. दोन्ही कारखाने पुढील 6 ते 12 महिन्यांत सुरु होऊ शकतात.
अंबुजा सिमेंटने सांगितले की, संपादनासाठी निधी जमा करण्यात येणार आहे. अजय कपूर, सीईओ आणि अंबुजा सिमेंटचे पूर्णवेळ संचालक म्हणाले, "पेन्ना सिमेंटच्या अधिग्रहणामुळे अंबुजाला दक्षिण भारतातील बाजारपेठेत प्रवेश करण्यास मदत होईल आणि देशांतर्गत सिमेंट उद्योगात कंपनीचे स्थान अधिक मजबूत होईल."
या अधिग्रहणामुळे अदानी सिमेंटचा बाजार हिस्सा 2 टक्क्यांनी वाढून 14 टक्के होईल. मे महिन्यात गुंतवणूकदारांना सांगितले की अदानी सिमेंटने 2028 पर्यंत देशातील सिमेंट बाजारपेठेत 20 टक्के हिस्सा गाठण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.
समूहाने 2028 पर्यंत आपली क्षमता 140 दशलक्ष टनांपर्यंत वाढवण्याचे लक्ष्यही ठेवले आहे. UltraTech ही देशातील सर्वात मोठी सिमेंट कंपनी आहे ज्याची क्षमता वार्षिक 151 दशलक्ष टन आहे आणि ती 2028 पर्यंत वार्षिक 200 दशलक्ष टनांपर्यंत वाढवण्याची योजना आहे.
सप्टेंबर 2022 मध्ये अंबुजा-एसीसीचे अधिग्रहण केल्यानंतर अदानी सिमेंटचा हा तिसरा करार असेल. FY2024 मध्ये, अंबुजा सिमेंटने गुजरातमधील संघी इंडस्ट्रीज सिमेंटचे अधिग्रहण केले होते आणि या वर्षी एप्रिलमध्ये तामिळनाडूमधील मायहोम इंडस्ट्रीजचे ग्राइंडिंग युनिट घेण्यास सहमती दर्शवली होती.
अदानी सिमेंटला आशा आहे की पेन्ना सिमेंटच्या दक्षिणेतील उपस्थितीमुळे देशाच्या पूर्वेकडील आणि दक्षिणेकडील भागांमध्ये त्याचा विस्तार करण्याची संधी मिळेल. याशिवाय सागरी मार्गाने श्रीलंकेच्या बाजारपेठेतही पोहोचता येणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.