Adani Group: भारत आणि आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक असलेल्या गौतम अदानी यांना आता राज्य सरकारकडून मोठा प्रकल्प मिळाला आहे. महाराष्ट्रातील शिंदे सरकारने स्मार्ट मीटर बसवण्याचे कंत्राट अदानी समूहाला दिले आहे.
(लोकल ते ग्लोबल लेटेस्ट अपडेट मिळवा सकाळच्या व्हॉट्सअप चॅनेलवर फक्त एका क्लिकमध्ये)
कंपनीला सार्वजनिक क्षेत्रातील वीज वितरण कंपनीकडून 13,888 कोटी रुपयांचे स्मार्ट मीटर बसवण्याचे दोन कंत्राटे मिळाली आहेत. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड (MSEDCL) ने स्मार्ट मीटर बसवण्यासाठी एकूण सहा कंत्राटे दिली आहेत. यापैकी अदानी समूहाला दोन मिळाली आहेत.
अदानी समूहाला स्मार्ट मीटर बसवण्याचे कंत्राट भांडुप, कल्याण आणि कोकण, बारामती आणि पुणे या ठिकाणी मिळाले आहेत. त्यापैकी अनुक्रमे 63.44 लाख मीटर आणि 52.45 लाख मीटर बसवण्यात येणार आहेत.
अदानी समूहाकडून कोणताही प्रतिक्रिया नाही
या संदर्भात अदानी समूहाकडून याबाबत कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. ज्या इतर कंपन्यांना ऑर्डर प्राप्त झाल्या आहेत त्यामध्ये एनसीसीचा समावेश आहे. याशिवाय माँटेकार्लो आणि जीनस यांना प्रत्येकी एक कंत्राट मिळाले आहे.
एनसीसीला नाशिक आणि जळगाव (रु. 3,461 कोटी किंमतीचे 28.86 लाख मीटर) आणि लातूर, नांदेड आणि औरंगाबाद (3,330 कोटी रुपये किंमतीचे 27.77 लाख मीटर) या दोन भागांसाठी कंत्राट मिळाले आहेत.
अलीकडेच अदानी समूहाला मुंबईतील बेस्ट उपक्रमाच्या वीज वितरण क्षेत्रात स्मार्ट मीटर बसवण्यासाठी 1,000 कोटी रुपयांचे कंत्राट मिळाले होते. यातच आता गौतम अदानी यांची कंपनी अदानी प्रॉपर्टीजने मुंबईच्या झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणासोबत संयुक्त उपक्रम स्थापन केला आहे.
या उपक्रमातून धारावीच्या पुनर्विकासाचे काम केले जाणार आहे. वृत्तसंस्था रॉयटर्सच्या म्हणण्यानुसार, अदानी समूहाच्या प्रवक्त्याने धारावी रिडेव्हलपमेंट प्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेड नावाच्या संस्थेच्या स्थापनेची माहिती दिली आहे, धारावी प्रकल्प कायदेशीर वादात अडकला असताना अदानी कंपनीने हे पाऊल उचलले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.