Adani Port: अलीकडेच अदानी समूहाच्या अदानी पोर्ट अमेरिकेकडून मोठा निधी मिळाला आहे. श्रीलंकेतील कोलंबो बंदर टर्मिनलच्या विकासासाठी अमेरिकन सरकारकडून 553 दशलक्ष डॉलरचा निधी प्राप्त झाला आहे. अदानी समूहाच्या म्हणण्यानुसार हा निधी मिळाल्याने अदानी पोर्टने परदेशात आपला व्यवसाय वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.
ब्लूमबर्गच्या रिपोर्टनुसार, 'गौतम अदानी यांचा मुलगा करण अदानी याने गेल्या आठवड्यात कोलंबोमध्ये श्रीलंकन अधिकारी आणि अमेरिकन अधिकाऱ्यांसमोर अमेरिकन सरकारकडून मिळालेल्या निधीबाबत दावा केला होता.'
कोलंबोमधील अदानी यांच्या नेतृत्वाखालील कचरा कंटेनर टर्मिनलला यूएस सरकार यूएस इंटरनॅशनल डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशनच्या माध्यमातून निधी देत आहे. यासह परदेशात अदानीच्या बंदर व्यवसायाच्या विस्तारामुळे हिंदी महासागरातील चीनच्या वर्चस्वावरही परिणाम होणार असून, व्यवसायासाठी जागतिक स्तरावर अदानी बंदर हा नवा पर्याय म्हणून उदयास आला आहे.
अदानी पोर्ट ही भारतातील सर्वात मोठी पोर्ट ऑपरेटर कंपनी आहे. यात 14 देशांतर्गत टर्मिनल्स आहेत, जे 600 दशलक्ष मेट्रिक टन क्षमता हाताळू शकतात.
करण अदानी यांच्या मते, आता अदानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन लिमिटेड शेजारील देशांमध्ये संधी शोधत आहे. यामध्ये बांगलादेश तसेच टांझानिया आणि व्हिएतनाम सारख्या पूर्व आफ्रिकन आणि दक्षिण पूर्व आशियाई देशांशी संभाव्य व्यापाराचा समावेश आहे. याशिवाय, कंपनी आधीच श्रीलंका आणि इस्रायलमधील विकासात भागीदार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.