Adani Group: अदानी समूह पुढील 10 वर्षांत 7 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. अदानी समूह देशातील सर्वात मोठ्या पायाभूत सुविधा क्षेत्रात आपले स्थान मजबूत करण्यासाठी ही योजना आखत आहे. समूहाचे सीएफओ, जुगशिंदर सिंग यांनी शुक्रवारी सांगितले की, समूहाकडे 20 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची क्षमता आहे.
समूहाच्या सीएफओनुसार, अदानी समूहाच्या 6 कंपन्या बाँड मार्केटच्या माध्यमातून गुंतवणुकीसाठी निधी उभारणार आहेत. अदानी ग्रुपची प्रमुख कंपनी अदानी एंटरप्रायझेसने आतापर्यंत खाणकाम, विमानतळ, संरक्षण, एरोस्पेस, सोलर मॅन्युफॅक्चरिंग, रस्ते, मेट्रो आणि रेल्वे, खाद्यतेल आणि अन्न, कृषी, डेटा सेंटर आणि संसाधन व्यवस्थापन अशा अनेक महत्त्वाच्या पायाभूत सुविधांची निर्मिती केली आहे.
अदानी समूहाची कंपनी अदानी पोर्ट्सने आर्थिक वर्ष 2023 मध्ये तीन पट वाढ नोंदवली आहे, कंपनीच्या भारतीय बंदर व्यवसायातील EBITDA मार्जिन 70% आहे. अदानी समुहाच्या अदानी रिन्यूएबल कंपनीने देखील या आर्थिक वर्षात (2023) 4 पट वाढ नोंदवली आहे आणि तिचे EBITDA मार्जिन 92% आहे. अदानी एनर्जी सोल्युशन्सनेही गेल्या आर्थिक वर्षात 3 पट वाढ नोंदवली आहे.
जुलै 2023 मध्ये समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांनी बंदरे, ऊर्जा आणि पायाभूत सुविधांच्या व्यवसायाचा मोठ्या प्रमाणावर विस्तार करण्याची घोषणा केली होती. अमेरिकेच्या सरकारी संस्थेने अदानी समूहाच्या श्रीलंकेतील बंदर प्रकल्पासाठी आर्थिक मदत जाहीर केल्याने अदानी समूहाला सर्वात मोठा दिलासा मिळाला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.