नवी दिल्ली : विक्रमी कमाई, उत्तम रोखतरलता आणि सर्वांत कमी कर्ज या बळावर अदानी उद्योगसमूहाने अमेरिकी शॉर्ट सेलर हिंडेनबर्गच्या आरोपांनंतरही भक्कम स्थिती प्राप्त केली असून, पुढील काळात आणखी प्रगती करण्यासाठी सज्ज आहे, असा विश्वास देशातील अब्जाधीश उद्योगपती गौतम अदानी यांनी व्यक्त केला.
देशातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वांत श्रीमंत व्यक्ती व अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी आज अदानी एंटरप्रायझेस लि. या समूहाच्या प्रमुख कंपनीच्या वार्षिक भागधारकांच्या बैठकीत बोलत होते. बंदर ते ऊर्जा क्षेत्रातील समूहाची कामगिरी पूर्वीपेक्षा उत्तम झाली असून, अद्याप सर्वोच्च उंची गाठणे बाकी आहे, असेही त्यांनी नमूद केले.
भारत २०३२ पर्यंत दहा लाख डॉलरची अर्थव्यवस्था होण्याच्या दिशेने वाटचाल करत असून, पायाभूत सुविधा क्षेत्र २.५ लाख कोटी डॉलरपर्यंत पोहोचण्यासाठी २० ते २५ टक्क्यांनी वाढण्याची अपेक्षा आहे. या वाटचालीत अदानी समूह एक पायाभूत सुविधा कंपनी म्हणून उत्तम गुंतवणूक करण्याच्या योग्य स्थितीत आहे, असेही त्यांनी नमूद केले.
अमेरिकी शॉर्ट सेलर हिंडेनबर्गच्या आरोपांनंतर गेल्या वर्षी या समूहाला संकटाचा सामना करावा लागला होता. ‘‘आमच्या अनेक दशकांच्या मेहनतीवर या निराधार आरोपांनी प्रश्नचिन्ह उभे केले. आमच्या सचोटी आणि प्रतिष्ठेवर झालेल्या हल्ल्याचा सामना करताना, आम्ही जिद्दीने लढलो आणि हे सिद्ध केले की कोणतेही आव्हान समूहचा पाया कमकुवत करू शकत नाही,’’ असेही अदानी म्हणाले.
‘‘समूहाने पुढील दोन वर्षांच्या कर्ज परतफेडीसाठी४० हजार कोटी रुपये उभारले असून, १७,५०० कोटी रुपयांचे कर्ज कमी केले असून, व्यवसायावर लक्ष केंद्रित केले आहे. या दृष्टिकोनामुळे आर्थिक लवचिकता बळकट झाली असून, भविष्यातील विस्तारासाठी ताकददेखील वाढली आहे,’’ असेही ते म्हणाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.