Adani Group: IANS न्यूज एजन्सी अदानींच्या ताब्यात, समूहाने वाढवली 76 टक्के हिस्सेदारी

AMG Media Networks: अदानी समूह मीडिया क्षेत्रात झपाट्याने आपले पाय पसरवत आहे. NDTV मधील बहुसंख्य भागभांडवल संपादन केल्यानंतर, अदानी समूहाने IANS India मधील आपली हिस्सेदारी वाढवली आहे. अदानी एंटरप्रायझेसच्या मालकीची उपकंपनी एएमजी मीडिया नेटवर्क्सने हा हिस्सा खरेदी केला होता.
Adani Group raises stake in news agency IANS
Adani Group raises stake in news agency IANS Sakal
Updated on

AMG Media Networks: अदानी समूह मीडिया क्षेत्रात झपाट्याने आपले पाय पसरवत आहे. NDTV मधील बहुसंख्य भागभांडवल संपादन केल्यानंतर, अदानी समूहाने IANS India मधील आपली हिस्सेदारी वाढवली आहे. अदानी एंटरप्रायझेसच्या मालकीची उपकंपनी एएमजी मीडिया नेटवर्क्सने हा हिस्सा खरेदी केला होता. कंपनीने सांगितले की संपादनाची किंमत 5 कोटी आहे.

यामुळे एएमजीची वृत्तसंस्थेतील भागीदारी आता 50.5 टक्क्यांवरून 76 टक्क्यांवर पोहोचली आहे. यापूर्वी एएमजीने एनडीटीव्ही ग्रुपलाही आपला भाग बनवले होते.

रॉयटर्सच्या अहवालानुसार, कंपनीने नियामक फाइलिंगमध्ये माहिती दिली की मतदान अधिकार श्रेणीमध्ये AMG चा हिस्सा 76 टक्के आणि गैर-मतदान अधिकार श्रेणीमध्ये 99.26 टक्के झाला आहे.

कंपनीने सांगितले की IANS ची बोर्ड मीटिंग 16 जानेवारीला झाली होती. यामध्ये शेअर्स खरेदीच्या निर्णयाला मान्यता देण्यात आली.

Adani Group raises stake in news agency IANS
Yes Bank Share: येस बँकेचे शेअर्स 4 वर्षानंतर पुन्हा अ‍ॅक्शन मोडवर; काय आहे कारण?

मीडियातही अदानी आणि अंबानींची स्पर्धा

देशातील दोन आघाडीचे उद्योगपती मुकेश अंबानी आणि गौतम अदानी आता वेगवेगळ्या क्षेत्रांप्रमाणेच माध्यमांमध्येही एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. अदानी समूहातील कंपनी एनडीटीव्हीची थेट स्पर्धा रिलायन्सच्या न्यूज 18 आणि मनीकंट्रोलशी आहे.

अदानी यांनी मार्च 2022 मध्ये बिझनेस आणि फायनान्शियल न्यूज डिजिटल मीडिया प्लॅटफॉर्म बीक्यू प्राइमचे संचालन करणाऱ्या क्विंटिलियन बिझनेस मीडियाचे अधिग्रहण करून मीडिया उद्योगात प्रवेश केला. त्यानंतर डिसेंबर 2022 मध्ये NDTV मधील सुमारे 65% हिस्सा विकत घेतला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.