Adani Group: गौतम अदानींना आणखी एक झटका, मुंबई विमानतळाच्या खात्यांची चौकशी सुरु

Adani Group: कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालय मुंबईतील अदानी समूहाच्या दोन विमानतळांच्या खात्यांची चौकशी करत आहे.
Adani Group says government probing accounts of two Mumbai airports
Adani Group says government probing accounts of two Mumbai airports Sakal
Updated on

Adani Group: अदानी एंटरप्रायझेसने शुक्रवारी स्टॉक एक्स्चेंजला कळवले की कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालय मुंबईतील समूहाच्या दोन विमानतळांच्या खात्यांची चौकशी करत आहे.

कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालय अदानी समूहाची प्रमुख कंपनी अदानी एंटरप्रायझेसच्या खात्यांची चौकशी करत आहे. वृत्तसंस्था रॉयटर्सच्या वृत्तानुसार, कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालय मुंबईतील अदानी समूहाच्या दोन विमानतळांचे खाते तपासत आहे.

मंत्रालयाने मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी आर्थिक वर्ष 2017-18 ते आर्थिक वर्ष 2021-22 पर्यंत माहिती आणि कागदपत्रे मागवली आहेत. अदानी समूहाने या प्रकरणी कोणतीही प्रतिक्रीया दिली नाही. याआधी फेब्रुवारीमध्येही कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने अदानी समूहाची चौकशी सुरू केली होती.

जानेवारी 2023 मध्येच अमेरिकन शॉर्ट सेलर हिंडेनबर्ग रिसर्चने आपल्या अहवालाद्वारे कंपनीला मोठा धक्का दिला होता. अदानी समुहाने हिंडेनबर्गचे स्टॉक मॅनिप्युलेशन आणि अकाउंटिंग फ्रॉडचे आरोप फेटाळले होते पण या धक्क्याचा फटका कंपनीच्या शेअर्सना बसला होता.

Adani Group says government probing accounts of two Mumbai airports
GST Tax: धक्कादायक! विमा कंपन्यांनी बनावट खर्च दाखवून केली 30,000 कोटी रुपयांची करचोरी

अदानी समूहाजवळ किती विमानतळ आहेत?

अदानी समूहाचे देशात सात विमानतळ असून त्यात मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाचाही समावेश आहे. हे विमानतळ 2021 मध्ये अदानी समूहाने विकत घेतले होते. यापूर्वी 2019 मध्ये, सरकारच्या पहिल्या खाजगीकरण मोहिमेदरम्यान, अदानी समूहाला सहा विमानतळ मिळाली होती. याशिवाय नवी मुंबईत नवीन विमानतळ बांधण्याचे काम सुरु आहे.

Adani Group says government probing accounts of two Mumbai airports
RBI Action: RBIची मोठी कारवाई, आणखी दोन बँकांना ठोठावला दंड, काय आहे कारण?

अदानी समूहाच्या शेअर्समध्ये घसरण

सुप्रीम कोर्टात अदानी-हिंडेनबर्ग प्रकरणाच्या सुनावणीमुळे काल अदानी समूहाचे शेअर्स घसरताना दिसत होते. दरम्यान, अदानी समूहाची प्रमुख कंपनी अदानी एंटरप्रायझेसच्या शेअर्सवर दबाव होता आणि तो 3 टक्क्यांहून अधिक घसरला.

काल शेअर 2422.35 रुपये प्रति शेअर खाली गेला होता, तर मागील ट्रेडिंग सत्रात म्हणजे हा शेअर 2,605.30 रुपये प्रति शेअरवर स्थिरावला होता. याशिवाय अदानी पॉवर आणि अदानी टोटल गॅसचे शेअर्स 1 ते 1.25 टक्क्यांनी घसरले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.