Adani Group: कोळशाची किमत वाढवली अन्.. अदानी ग्रुप असा करतोय Coal Scam? अहवालात धक्कादायक माहिती

Adani Group: गौतम अदानी यांच्या नेतृत्वाखालील अदानी समूहाने तामिळनाडू जनरेशन अँड डिस्ट्रिब्युशन कंपनी (टांगेडको) या सरकारी मालकीची वीज वितरण कंपनी (डिस्कॉम) सोबतच्या व्यवहारात कमी दर्जाच्या कोळशाची किमत वाढवून लावण्यात आली आहे.
Adani group supplied low-quality coal to Tamil Nadu’s Tangedco at high cost report
Adani group supplied low-quality coal to Tamil Nadu’s Tangedco at high cost reportSakal
Updated on

Adani Group: गौतम अदानी यांच्या नेतृत्वाखालील अदानी समूहाने तामिळनाडू जनरेशन अँड डिस्ट्रिब्युशन कंपनी (टांगेडको) या सरकारी मालकीची वीज वितरण कंपनी (डिस्कॉम) सोबतच्या व्यवहारात कमी दर्जाच्या कोळशाची किमत वाढवून लावण्यात आली आहे.

फायनान्शिअल टाइम्स (FT) ने हा अहवाल ऑर्गनाइज्ड क्राइम अँड करप्शन रिपोर्टिंग प्रोजेक्ट (OCRP) द्वारे कागदपत्रांसह प्रकाशित केला आहे. “अदानी समूहाने फसवणूक करून मोठा नफा मिळवला असावा, कारण कमी दर्जाचा कोळसा विजेसाठी वापरणे म्हणजे जास्त इंधन जाळणे,” असे अहवालात म्हटले आहे.

अहवालात असे म्हटले आहे की जानेवारी 2014 मध्ये, अदानी यांनी कोळशाची एक इंडोनेशियन शिपमेंट खरेदी केली. MV Kalliopi L या जहाजाने आणलेली ही शिपमेंट नंतर Tangedco ला 6,000-कॅलरी कोळसा म्हणून विकण्यात आली, असे अहवालात म्हटले आहे. 6,000-कॅलरी कोळसा हा इंधनाच्या सर्वात मौल्यवान श्रेणींपैकी एक असल्याने, अदानीने त्याचे पैसे दुप्पट केले असावेत, असे अहवालात म्हटले आहे.

“अदानी समूहाने कमी-कॅलरी उत्पादनासाठी ओळखल्या जाणाऱ्या खाण गटाकडून इंडोनेशियातील कोळसा कमी किमतीत मिळवला,”

Adani group supplied low-quality coal to Tamil Nadu’s Tangedco at high cost report
SEBI: शेअर बाजारातील अफवा थांबवण्यासाठी सेबीने जाहीर केली मार्गदर्शक तत्त्वे; गुंतवणूकदारांवर होणार मोठा परिणाम

अदानी यांनी फसवणुकीचे आरोप फेटाळले आहेत. कंपनीच्या प्रवक्त्याचे म्हणणे आहे की, कोळशाच्या गुणवत्तेची स्वतंत्रपणे लोडिंग आणि डिस्चार्जच्या वेळी सीमाशुल्क अधिकारी आणि टांगेडको शास्त्रज्ञांनी चाचणी केली होती.

अदानी समूहाच्या प्रवक्त्याने सांगितले की, “पुरवलेल्या कोळशाने अनेक एजन्सींनी अनेक ठिकाणी गुणवत्ता तपासणी प्रक्रिया पार केली असल्याने, कमी दर्जाच्या कोळशाच्या पुरवठ्याचा आरोप केवळ निराधार आणि अयोग्य आहे,”

Adani group supplied low-quality coal to Tamil Nadu’s Tangedco at high cost report
China Import: चीनमधून लॅपटॉप, टॅबलेटची आयात 47 टक्क्यांनी वाढली; मार्चमध्ये 273.6 दशलक्ष डॉलर किमतीची उत्पादने केली ऑर्डर

2018 मध्ये, चेन्नईस्थित एनजीओ अरापोर इयक्कमने “कोळसा इनव्हॉइसिंग घोटाळा” असल्याचा आरोप केला. तामिळनाडूच्या दक्षता आणि भ्रष्टाचारविरोधी संचालनालयाकडे तक्रार केली, की टँगेडकोने "कोळशासाठी बाजारभावापेक्षा जास्त पैसे दिले''. “गेल्या दशकात टांगेडकोला दरवर्षी मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे,” असे एनजीओने आपल्या तक्रारीत म्हटले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.