Adani Group: अदानी समूहाच्या विविध क्षेत्रातील 10 कंपन्या शेअर बाजारात लिस्ट आहेत. अदानी समूहाकडे अशा अनेक कंपन्या आहेत ज्या शेअर बाजारात लिस्ट नाहीत. आता अदानी समूह विमानतळ व्यवसायात असलेल्या कंपन्यांना शेअर बाजारात लिस्ट करण्याचा विचार करत आहे.
अदानी समूहाच्या विमानतळ व्यवसायाचे प्रमुख जीत अदानी यांनी सांगितले की, अदानी एअरपोर्ट्स होल्डिंग्ज लिमिटेड भविष्यात स्टॉक एक्स्चेंजमध्ये लिस्ट होईल.
हैदराबादमधील एका कार्यक्रमात बोलताना जीत अदानी म्हणाले की, विमानतळ व्यवसायात वाढ होत आहे. ते म्हणाले की, देशाच्या गरजा पूर्ण करणे आणि भारताच्या विकासात महत्त्वपूर्ण योगदान देणे हे अदानी समूहाचे ध्येय आहे. ते म्हणाले की, गेल्या 30 वर्षांत आपण देशासाठी असेच योगदान दिले आहे.
कंपनी कोणत्या विमानतळांवर काम करते?
अदानी समूह मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाची देखभाल करते. तसेच नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ विकसित करत आहे, जे डिसेंबरपर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे. याशिवाय कंपनी अहमदाबाद, लखनौ, मंगळुरु, जयपूर, गुवाहाटी आणि तिरुवनंतपुरम येथील विमानतळांची देखरेख करते.
प्रवाशांच्या संख्येत वाढ
जीत अदानी म्हणाले की, 2022-23 या आर्थिक वर्षात 8 कोटी लोकांनी या विमानतळांवरून प्रवास पूर्ण केला आहे. या आकडेवारीत विक्रमी वाढ झाल्याचे दिसून आले आहे. हा आकडा प्री-कोविड प्रवाशांच्या संख्येपेक्षा जास्त आहे.
देशातील सर्वात मोठी विमानतळ कंपनी
मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामध्ये अदानी एअरपोर्ट होल्डिंग्सचा 73% हिस्सा आहे. अदानी विमानतळाच्या पोर्टफोलिओमध्ये 8 विमानतळ आहेत, त्यापैकी काहींवर काम सुरू आहे. ही कंपनी देशातील सर्वात मोठी विमानतळ पायाभूत सुविधा पुरवणारी कंपनी आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.