Gautam Adani: अदानींचा डोळा अंबानींच्या कंपनीवर, विकत घेणार दिवाळखोर कंपनी?

गौतम अदानी आणि त्यांचा अदानी समूह पुन्हा पूर्ववत होण्याचा प्रयत्न करत आहे.
Gautam Adani
Gautam AdaniSakal
Updated on

Gautam Adani: गौतम अदानी आणि त्यांचा अदानी समूह पुन्हा पूर्ववत होण्याचा प्रयत्न करत आहे. ज्याअंतर्गत ते निधी उभारण्यासोबतच गुंतवणुकीवर भर देत आहेत. अशा परिस्थितीत संकटाचा सामना करत असलेल्या अनिल अंबानींचा कोळसा ऊर्जा प्रकल्प विकत घेण्याची योजना अदानींनी आखली आहे.

सध्या दिवाळखोर कंपनीचा न्यायालयाद्वारे लिलाव केला जात आहे. विदर्भ इंडस्ट्रीज पॉवर लिमिटेड असे या पॉवर प्लांटचे नाव आहे. दुसरीकडे, रिलायन्स पॉवर लिमिटेड हा प्लांट परत मिळवण्यासाठी प्रस्ताव देण्याच्या विचारात आहे.

अदानी आणि रिलायन्स पॉवर या दोघांनी अद्याप औपचारिक प्रस्ताव मांडणे बाकी आहे. या प्रकरणावर रिलायन्सने प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे, तर अदानी समूहाच्या प्रवक्त्याकडून कोणतीही प्रतिक्रिया आली नाही.

जर अदानी पॉवर प्लांट मिळवण्यात यशस्वी झाले तर त्यांच्या कोळसा ऊर्जा प्रकल्पांच्या पोर्टफोलिओमध्ये भर घालेल. अदानी समूह जानेवारीमध्ये हिंडेनबर्ग संशोधन अहवालातून सावरण्याचा प्रयत्न करत आहे. अमेरिकन शॉर्ट सेलरच्या अहवालानंतर समूहाच्या मार्केट कॅपमध्ये प्रचंड घसरण झाली आहे.

Gautam Adani
Ashneer Grover On GST: ऑनलाइन गेमिंगवर 28% GST लावल्यानंतर अश्नीर ग्रोवरचा संताप, ट्वीट करत म्हणाला...

अनिल अंबानींची आर्थिक स्थिती कमकुवत

विदर्भ इंडस्ट्रीज दुसऱ्या कंपनीकडे गेल्यास अंबानींची स्थिती आणखीनच कमकुवत होईल. एकेकाळी अनिल अंबानी हे देशातील सर्वात मोठ्या अब्जाधीशांपैकी एक होते. मात्र मोठे नुकसान सहन करून ते अनेक वर्षांपासून कर्जमुक्त होण्याचा प्रयत्न करत आहेत.

यावेळी अनिल अंबानी आणि त्यांच्या पत्नीच्या अडचणी वाढल्या आहेत. त्यांची आणि त्यांची पत्नी टीना अंबानी यांची फॉरेन एक्स्चेंज नियम (फेमा) प्रकरणी चौकशी केली जात आहे. 2004 मध्ये पहिल्यांदा मुकेश आणि अनिल अंबानी यांच्यातील भांडण समोर आले होते.

2005 मध्ये रिलायन्सचा व्यवसाय दोघांमध्ये विभागला गेला. रिलायन्सच्या विभाजनानंतर, पेट्रोकेमिकल व्यवसायातील मुकेश अंबानी यांचा वाटा रिलायन्स इंडस्ट्रीज, इंडियन पेट्रो केमिकल्स कॉर्प लिमिटेड, रिलायन्स पेट्रोलियम, रिलायन्स इंडस्ट्रियल इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड यांच्याकडे आला, तर धाकट्या भावाच्या वाट्यामध्ये आरकॉम, रिलायन्स कॅपिटल, रिलायन्स एनर्जी यांचा समावेश होता.

Gautam Adani
Indian Politics :पक्षाचे 'आयकॉन' पळवून भारतात निवडणूक जिंकता येईल का?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.