Adani Group warns Bangladesh: अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांनी बांगलादेशच्या नव्या अंतरिम सरकारला इशारा दिला आहे. अदानी समूहाला पैसे देण्यास उशीर झाल्यामुळे हा इशारा देण्यात आला आहे. अदानी समूह बांगलादेशला वीजपुरवठा करतो.
बांगलादेश सरकार अदानी समूहाला 500 दशलक्ष डॉलर (सुमारे 4200 कोटी रुपये) देणे आहे. ही रक्कम सातत्याने वाढत आहे. बांगलादेशने पैसे भरण्यास उशीर केल्यास बांगलादेशच्या वीज पुरवठ्यावर परिणाम होऊ शकतो.