Gautam Adani: अदानी-हिंडेनबर्ग वादात PM मोदींच्या आर्थिक सल्लागाराचे सूचक वक्तव्य; म्हणाले...

पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार समितीचे सदस्य असलेल्या सन्याल यांनी न्यूयॉर्कमध्ये एका मुलाखतीत मोठे वक्तव्य केले आहे.
Adani-Hindenburg Crisis
Adani-Hindenburg Crisis Sakal
Updated on

Adani-Hindenburg Crisis : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अदानी समूहाच्या अमेरिकन शॉर्ट सेलरसोबतच्या वादात हस्तक्षेप केलेला नाही. असे पंतप्रधानांचे आर्थिक सल्लागार संजीव सन्याल यांनी सांगितले.

पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार समितीचे सदस्य असलेल्या सन्याल यांनी न्यूयॉर्कमध्ये एका मुलाखतीत सांगितले की, "सरकारने कुठेही हस्तक्षेप केलेला नाही. आमच्या व्यवस्थेत कोणालाही वाचवायला जागा नाही."

अमेरिकन रिसर्च फर्म हिंडेनबर्गच्या अहवालानंतर अदानी समूहाच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली आहे. आता पहिल्यांदाच या वादावर पीएम मोदींच्या आर्थिक सल्लागाराची प्रतिक्रिया आली आहे. (Adani-Hindenburg crisis Government hasn’t intervened in this matter says Economic Advisor Sanjeev Sanyal)

एलआयसी आणि एसबीआय कोणत्याही आर्थिक तणावाखाली नाहीत :

संन्याल म्हणाले की, देशातील सर्वात मोठी फायनान्सर स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) आणि देशातील सर्वात मोठी विमा कंपनी एलआयसीमध्ये अदानी समूहाच्या कंपन्यांचे एक्सपोजर फारच कमी आहे. ते पुढे म्हणाले की कोणत्याही कंपनीवर आर्थिक ताण पडत नाही.

हिंडेनबर्ग रिसर्चच्या 24 जानेवारीच्या अहवालानंतर फसवणूक आणि बाजारातील हेराफेरीचा आरोप केल्यानंतर अदानी समूहाच्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली.

आशियातील सर्वात श्रीमंत उद्योगपतींपैकी एक असलेल्या गौतम अदानी यांनी हिंडेनबर्गचे आरोप चुकीचे असल्याचे म्हटले आहे. या अहवालानंतर, विक्रीमुळे अदानी समूहाचे बाजार मूल्य 100 अब्ज डॉलरपेक्षा जास्त घसरले आहे.

Adani-Hindenburg Crisis
New Rules From 1st April : सोने खरेदी ते बँक... 1 एप्रिलपासून बदलणार 'हे' नियम, जाणून घ्या एका क्लिकवर

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत दिलेल्या माहितीनुसार, 5 मार्च 2023 पर्यंत LIC कडे अदानी समूहाच्या कंपन्यांचे 61.8 अब्ज (755 दशलक्ष डॉलर) कर्ज आहे. हे कर्ज 31 डिसेंबर 2022 रोजी 6,347 कोटी रुपये होते. देशातील सर्वात मोठी बँक एसबीआयकडे अदानी समूहाच्या कंपन्यांमध्ये सुमारे 270 अब्ज रुपयांचे कर्ज आहे.

सिलिकॉन व्हॅलीवर काय म्हणाले?

सान्याल म्हणाले की सिलिकॉन व्हॅली बँकेच्या नुकत्याच झालेल्या पतनाचा भारतातील स्टार्टअपवर थेट परिणाम होणार नाही. सन्याल पुढे म्हणाले की, मार्केटमध्ये पारदर्शकता आणि तरलता आहे याची खात्री करणे हे आमचे काम आहे. इथे आमच्या हस्तक्षेपाची गरज नाही.

Adani-Hindenburg Crisis
नोकरदार असाल तर रोखीनंच घ्या कार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.