Adani Group: अदानी समूहाबाबत मोठी बातमी समोर येत आहे. अहवालानुसार, अदानी विल्मारमधील हिस्सा विकण्यासाठी समूह मोठ्या कंपन्यांशी चर्चा करत आहे. महिनाभरात हा व्यवहार होईल अशी माहिती आहे. अदानी विल्मारमध्ये अदानी ग्रुपचा एकूण हिस्सा 43.97 टक्के आहे. कंपनी फॉर्च्युन ब्रँड नावाने खाद्यतेल आणि पॅकेज किराणा सामान विकते.
Economic Timesच्या अहवालानुसार, अदानी समूह आपला हिस्सा 2.5-3 अब्ज डॉलर्समध्ये विकू शकतो. सध्या सिंगापूरच्या विल्मर इंटरनॅशनलचाही संयुक्त उपक्रमात 43.97 टक्के हिस्सा आहे. त्याच वेळी, कंपनीमध्ये सार्वजनिक भागीदारी 12.06 टक्के आहे. या संपूर्ण प्रकरणावर अदानी समूहाकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.
अदानी समूह हिस्सा का विकत आहे?
या प्रकरणाची माहिती असलेल्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या मते, “अदानी समूह अनेक व्यवसायातून बाहेर पडू शकतो. पायाभूत सुविधांवर अधिक लक्ष केंद्रित करण्याची अदानी समूहाची योजना आहे.
अदानी विल्मारमधील हिस्सेदारी कमी करण्याची योजना या प्रक्रियेचा एक भाग आहे," हा पैसा समूह आपल्या व्यवसायासाठी वापरणार असल्याचे त्यांनी सांगितले. सध्या कर्ज फेडण्याची कोणतीही योजना नाही.
कंपनीच्या शेअर्समध्ये घसरण
खाद्यतेलाच्या व्यवसायात अदानी विल्मारचे वर्चस्व आहे. गेल्या आर्थिक वर्षात कंपनीला 607 कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला होता. तर एकूण महसूल 55,262 कोटी रुपये होता.
मात्र, मे महिन्यापासून आतापर्यंत अदानी विल्मारच्या शेअर्समध्ये घसरण झाली आहे. मे 2023 मध्ये अदानी विल्मरचे शेअर्स 488 रुपयांना विकले जात होते. ते आता 317.45 रुपयांपर्यंत घसरले आहेत.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.