Adani Group: गौतम अदानी आणखी एक मोठा करार करणार आहेत. अदानी पोर्ट्स ही अदानी ग्रुपची कंपनी शापूरजी पालोनजी ग्रुप (SP ग्रुप) सोबत ओरिसातील गोपालपूर बंदर खरेदी करण्यासाठी चर्चा करत आहे. हा करार 1100-1200 कोटी रुपयांना होऊ शकतो.
गोपालपूर पोर्ट्समध्ये एसपी पोर्ट्सचा 56% हिस्सा
ओरिसाच्या गोपाळपूर बंदरामध्ये एसपी पोर्ट्स मेंटेनन्सचा 56% हिस्सा आहे. उर्वरित भागभांडवल ओरिसा स्टीव्हडोरेस (OSL) कडे आहे. एसपी पोर्ट्स 100% एसपी इम्पीरियल स्टारच्या मालकीचे आहे.
अदानी पोर्ट्स ही भारतातील सर्वात मोठी कंपनी आहे. अदानी पोर्ट्सचे मार्केट कॅप 2.23 लाख कोटी रुपये आहे. गुरुवारी, शेअर बाजारातील घसरणीच्या काळातही अदानी पोर्ट्सचे शेअर्स 1.63 टक्क्यांनी वाढले होते.
अदानी पोर्ट्सच्या शेअर्सनी 27 मार्च 2020 रोजी 300 टक्के मल्टीबॅगर परतावा देऊन गुंतवणूकदारांना मालामाल केले होते. 5 डिसेंबर 2008 रोजी, अदानी पोर्ट्सचे शेअर्स 54 रुपयांवर होते. आत्तापर्यंत कंपनीतील गुंतवणूकदारांची संपत्ती जवळपास 2000 टक्क्यांनी वाढली आहे.
अदानी समूहाचे मार्केट कॅप मंगळवारी 1.92 लाख कोटी रुपयांनी वाढून 13.9 लाख कोटी रुपयांवर पोहोचले होते, गेल्या दोन सत्रांमध्ये अदानी समूहाच्या मार्केट कॅपमध्ये सुमारे 2.5 लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे. बुधवारच्या सत्रासह मागील 6 सत्रांवर नजर टाकली तर मार्केट कॅपमध्ये 4.9 लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे. (Market cap increased by Rs 2.5 lakh crore in two days)
नोंद: क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.