Adani Deal: गौतम अदानींची आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये मोठी गुंतवणूक; आता 'ही' कंपनी घेणार विकत

Artificial Intelligence: Coredge.io हे स्थानिक डीप टेक स्टार्टअप आहे, जे AI आणि क्लाउड प्लॅटफॉर्मवर काम करते. ते जपान, सिंगापूर आणि भारतातील ग्राहकांना सेवा पुरवते. कंपनी तिच्या मूळ कंपनी ParserLabs अंतर्गत कार्यरत आहे, ज्याची उलाढाल FY24 मध्ये 45.63 कोटी रुपये होती.
Artificial Intelligence
Adani GroupSakal
Updated on

Adani Group: गौतम अदानी देशातील आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि क्लाउड सेवांचा चेहरामोहरा बदलण्याच्या तयारीत आहे. अदानी समूह आणि अबू धाबी स्थित सिरियस इंटरनॅशनल होल्डिंगच्या संयुक्त उपक्रमाद्वारे AI आणि क्लाउड प्लॅटफॉर्म स्टार्टअप Coredge.io मधील बहुसंख्य भागभांडवल खरेदी करण्याची घोषणा केली आहे.

Sirius Digitech ने Coredge.ioच्या मूळ कंपनी ParserLabs India मधील 77.5% भागभांडवल खरेदी करण्यासाठी बंधनकारक करार केला आहे. हे संपादन सप्टेंबरपर्यंत पूर्ण होईल.

Coredge.ioचे जपान, सिंगापूर आणि भारतात ग्राहक

Coredge.io हे स्थानिक डीप टेक स्टार्टअप आहे, जे AI आणि क्लाउड प्लॅटफॉर्मवर काम करते. ते जपान, सिंगापूर आणि भारतातील ग्राहकांना सेवा पुरवते. कंपनी तिच्या मूळ कंपनी ParserLabs अंतर्गत कार्यरत आहे, ज्याची उलाढाल FY24 मध्ये 45.63 कोटी रुपये होती.

अदानी ग्रुपची प्रमुख कंपनी अदानी एंटरप्रायझेसने शेअर बाजाराला दिलेल्या माहितीनुसार, हा संपूर्ण करार किंवा त्याऐवजी कंपनीचे अधिग्रहण सप्टेंबर 2024 च्या अखेरीस पूर्ण होण्याची शक्यता आहे. माहितीनुसार, ParserLabs India कडे Courge.io इंडियाची 100 टक्के होल्डिंग आहे.

Artificial Intelligence
RBI: आरबीआयचा कर्जदारांना दिलासा! नियमात केला मोठा बदल; बँकांना पाठवल्या सूचना

गेल्या आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये कंपनीचा व्यवसाय 45.63 कोटी रुपये होता. विशेष बाब म्हणजे गेल्या तीन आर्थिक वर्षांत कंपनीच्या व्यवसायात सुमारे 4 पट वाढ झाली आहे. आर्थिक वर्ष 2023 मध्ये कंपनीची उलाढाल 28.94 कोटी रुपये होती. तर आर्थिक वर्ष 2022 मध्ये हा व्यवसाय 12.09 कोटी रुपये होता.

Artificial Intelligence
Budget Halwa Ceremony: अर्थसंकल्पापूर्वी अर्थमंत्र्यांच्या उपस्थितीत हलवा समारंभ संपन्न; पाहा VIDEO

हा संयुक्त उपक्रम आहे

गौतम अदानी गेल्या वर्षी, यूएईची आंतरराष्ट्रीय होल्डिंग कंपनी IHC आणि अदानी एंटरप्रायझेसची सिरियस इंटरनॅशनल होल्डिंग लिमिटेड यांनी सिरियस डिजीटेक इंटरनॅशनल लिमिटेड नावाचा संयुक्त उपक्रम स्थापन केला होता. ज्यामध्ये अदानींकडे 49 टक्के आणि सिरियस इंटरनॅशनल होल्डिंग लिमिटेडकडे 51 टक्के हिस्सा आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.