Adani Total Gas: अदानी टोटल गॅसने CNG-PNG च्या दरात केली मोठी कपात, मध्यरात्री 12 पासून नवीन दर लागू

अदानी टोटल गॅस लिमिटेड (ATGL) ने जनतेला मोठा दिलासा दिला आहे.
Adani Total Gas
Adani Total GasSakal
Updated on

Adani Total Gas: अदानी टोटल गॅस लिमिटेड (ATGL) ने जनतेला दिलासा दिला आहे. कंपनीने सीएनजीच्या किंमतीत प्रति किलो 8.13 रुपये आणि पीएनजीच्या दरात 5.06 रुपये प्रति घन सेंटीमीटरने कपात करण्याची घोषणा केली आहे. सीएनजी-पीएनजीचे सुधारित दर 8 एप्रिलच्या मध्यरात्री 12 पासून लागू झाले आहेत.

CNG आणि PNG च्या किंमतीत कपात करण्याची अदानी टोटल गॅसची घोषणा केंद्र सरकारने घरगुती नैसर्गिक वायूच्या किंमती निश्चित करण्याचा नवीन फॉर्म्युला जाहीर केल्यानंतर एक दिवसानंतर केली.

नवीन किंमत प्रणालीमुळे सीएनजी आणि पीएनजीच्या किंमती कमी होण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे सीएनजी आणि पीएनजीच्या किंमती 10 टक्क्यांनी कमी होणार आहेत. (Adani Total Gas Ltd reduces price of CNG by up to Rs 8.13/kg, PNG by up to Rs 5.06/scm)

नव्या फॉर्म्युल्यानुसार आता सीएनजी-पीएनजी दर महिन्याला निश्चित होतील. आतापर्यंत दर सहा महिन्यांनी सीएनजी-पीएनजीचे दर निश्चित केले जात होते.

अंतिम ग्राहकांना प्राधान्य देण्याच्या धोरणाच्या अनुषंगाने, ATGL ने भारत सरकारच्या नवीन गॅस किंमतीचे पालन करून घरगुती PNG आणि CNG ग्राहकांना लाभ देण्याचा निर्णय घेतला आहे, असे कंपनीने एका निवेदनात म्हटले आहे.

अशा प्रकारे CNG ग्राहकांना पेट्रोलच्या किंमतींच्या तुलनेत 40% पेक्षा जास्त बचत होणार आहे आणि LPG किंमतींच्या तुलनेत घरगुती PNG ग्राहकांसाठी सुमारे 15% बचत होणार आहे.

Gail India ची उपकंपनी असलेल्या Mahanagar Gas Limited (MGL) ने देखील CNG च्या किरकोळ किंमतीत 8 रुपये प्रति किलो आणि PNG च्या किरकोळ किंमतीत 5 रुपये प्रति SCM ची कपात करण्याची घोषणा केली आहे.

Adani Total Gas
Gold Silver Price : वीकेंडला सोनं स्वस्त! खरेदी करण्याची सुवर्णसंधी; जाणून घ्या तुमच्या शहरातील दर

सरकारी आणि खासगी कंपन्यांवर दबाव वाढेल :

अदानी टोटल गॅस कंपनी देशातील काही मोठ्या शहरांमध्ये काम करते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अदानी गॅस अहमदाबाद, वडोदरा, फरीदाबाद आणि खुर्दा येथे काम करत आहे.

याशिवाय अदानी गॅस कंपनी प्रयागराज, चंदीगड, पानिपत, दमण, धारवाड, उधम सिंग नगर आणि एर्नाकुलममध्ये वितरण नेटवर्क सुरू करणार आहे.

मात्र, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांमध्ये ही कंपनी अद्याप पोहोचलेली नाही. मात्र कमी किंमतीमुळे इतर सरकारी आणि खासगी कंपन्यांवरही दबाव वाढणार आहे.

Adani Total Gas
सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.