Adani Wilmar: 'फॉर्च्युन' ब्रँडच्या नावाचा चुकीचा वापर! अदानी विल्मारची पोलिसात तक्रार, काय आहे प्रकरण?

कंपनीने अहवाल दिलेल्या उत्पादनांची चौकशी सुरू केली आहे.
Gautam Adani
Gautam AdaniSakal
Updated on

Adani Wilmar News: देशातील सर्वात मोठ्या खाद्यतेल कंपन्यांपैकी एक असलेल्या अदानी विल्मारने शनिवारी कंपनीच्या 'फॉर्च्युन' ब्रँड अंतर्गत बनावट खाद्यतेल विकणाऱ्या B2B प्लॅटफॉर्मविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे.

अशा परिस्थितीत अदानी विल्मारने गौतम बुद्ध नगरमधील पोलिसात तक्रार दाखल केली आहे. अदानी विल्मर भारतातील अनेक राज्यांमध्ये फॉर्च्युन या ब्रँड नावाने खाद्यतेल विकते.

कंपनीने आपल्या एका निवेदनात म्हटले आहे की, बनावट उत्पादने बनवणे आणि विकल्याबद्दल त्यांनी B2B प्लॅटफॉर्मच्या विरोधात एफआयआर नोंदवला आहे.

उत्तर प्रदेशातील गौतम बुद्ध नगर जिल्ह्यातील बदलपूर पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. अदानी विल्मर म्हणाले की, तपास अधिकाऱ्यांनी बिझनेस टू बिझनेस प्लॅटफॉर्मच्या गोदामावर छापा टाकला, ज्यामध्ये अदानी विल्मरच्या फॉर्च्यून ऑइलच्या नावाने बनावट उत्पादने जप्त करण्यात आली.

छाप्यात काय सापडले

अधिकाऱ्यांनी टाकलेल्या छाप्यात फॉर्च्युन ब्रँडचे तेल मोठ्या प्रमाणात सापडले आहे. जप्त केलेल्या उत्पादनांमध्ये फॉर्च्यून मोहरीच्या तेलाच्या (1 लीटर पॅक), 1 लीटर पाऊचमध्ये 37 बनावट बाटल्या (फॉर्च्यून रिफाइंड सोयाबीन तेल) आणि 1 लिटर पॅकमध्ये फॉर्च्युन मस्टर्ड ऑइलच्या 16 बाटल्यांचा समावेश आहे.

अदानी विल्मरच्या प्रवक्त्याने सांगितले की, ते बाजारात असलेल्या बनावट उत्पादनांची आणि ग्राहकांच्या आरोग्याची चिंता करत आहेत. त्यामुळेच तक्रार दाखल करण्यात आली आहे.

Gautam Adani
Mukesh Ambani: मुकेश अंबानींच्या नव्या कंपनीची शेअर बाजारात एंट्री, अदानींच्या 'या' कंपनीला टाकले मागे

बनावट उत्पादनात या गोष्टी तपासा

कंपनीच्या प्रवक्त्याने सांगितले की, बनावट उत्पादनांचा मुद्दा गांभीर्याने घेत, कंपनी बनावट वस्तूंचे स्त्रोत त्वरीत ओळखण्यासाठी आणि अशा व्यापाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी अधिकाऱ्यांना सहकार्य करत आहे.

निवेदनानुसार, कंपनीने अहवाल दिलेल्या उत्पादनाची चौकशी सुरू केली आहे. बनावट ब्रँडच्या तपासात बॅच कोड तपशील, बनावट क्यूआर कोड आणि पॅकेजिंग इत्यादी गोष्टींवर लक्ष दिले जात आहे.

खाद्यतेलाच्या किंमतीत कपात

अदानी विल्मरने बुधवारी सांगितले की, खाद्यतेलाच्या किंमतीत घसरण आणि त्यांच्या खाद्य उत्पादनांची मागणी यामुळे पहिल्या तिमाहीत विक्री 15 टक्क्यांनी घसरली आहे.

ग्राहकांची कमी मागणी, काही प्रदेशात कमी पुरवठा आणि तेलबियांचे उत्पादन यामुळे ही घसरण झाल्याचे कंपनीने म्हटले आहे, यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत खाद्यतेलाच्या किंमती घसरल्या आहेत.

Gautam Adani
Adhik Shravan Maas : अधिक श्रावण मास चित्तशुद्धीचा पर्वकाळ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.