Aditya Birla: आदित्य बिर्ला देणार टाटा-अंबानींना टक्कर; 'या' क्षेत्रात केली एन्ट्री, काय आहे कंपनीचा प्लॅन?

Birla Jewellery Business: आदित्य बिर्ला ग्रुपने ज्वेलरी क्षेत्रात प्रवेश केला आहे. कंपनीने 'इंद्रिया' नावाचा ब्रँड लॉन्च केला आहे. कंपनीने देशातील तीन शहरांमध्ये 4 स्टोअर्ससह या क्षेत्रात प्रवेश केला आहे. दिल्लीतील करोलबाग, जयपूर आणि इंदूरमध्ये इंद्रियाची दुकाने उघडण्यात आली आहेत.
Aditya Birla
Birla Jewellery BusinessSakal
Updated on

Indriya Jewellery Brand: आदित्य बिर्ला ग्रुपने ज्वेलरी क्षेत्रात प्रवेश केला आहे. कंपनीने 'इंद्रिया' नावाचा ब्रँड लॉन्च केला आहे. कंपनीने देशातील तीन शहरांमध्ये 4 स्टोअर्ससह या क्षेत्रात प्रवेश केला आहे. दिल्लीतील करोलबाग, जयपूर आणि इंदूरमध्ये इंद्रियाची दुकाने उघडण्यात आली आहेत.

कंपनीने सांगितले की, पुढील 5 वर्षांत भारतातील तिसरा सर्वात मोठा ज्वेलरी रिटेल ब्रँड बनवण्याचे त्यांचे लक्ष्य आहे. या व्यवसायाच्या विस्तारासाठी 5000 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार आहे.

पुढील 6 महिन्यांत 11 दुकाने उघडली जातील

भारतातील दागिन्यांची बाजारपेठ सुमारे 6.7 लाख कोटी रुपयांची आहे. बिर्ला समूहाने या दागिन्यांच्या बाजारात प्रवेश केला आहे. कंपनीने सांगितले की, सध्या 3 शहरांमध्ये चार रिटेल स्टोअर्स उघडण्यात आली आहेत.

येत्या 6 महिन्यांत 11 शहरांमध्ये इंद्रियाची स्टोअर्स उघडण्याची कंपनीची योजना आहे. कंपनीने दर 45 दिवसांनी 5000 खास डिझाईन्ससह एक नवीन डिझाईन लॉन्च करण्याबाबत सांगितले आहे.

Aditya Birla
Internship Scheme: एक कोटी तरुणांना 5 हजार रुपये कसे मिळणार? अर्थमंत्र्यांनी सांगितला प्लॅन

यापूर्वी पेंट ब्रँड Opus लाँच करण्यात आला होता

बिर्ला समूहाचे अध्यक्ष कुमारमंगलम बिर्ला म्हणाले की, यावर्षी आम्ही ग्राहक व्यवसायातील दोन मोठ्या ब्रँडची घोषणा केली आहे. पहिला ब्रँड पेंट सेगमेंटमधला Opus आणि दुसरा ब्रँड ज्वेलरी सेगमेंटमध्ये Indriya आहे. भारतात ग्राहक व्यवसाय झपाट्याने वाढत आहे. सध्या, समूहाचा 20 टक्के ग्राहक व्यवसाय आहे.

या मोठ्या ब्रँड्सशी करणार स्पर्धा

बिर्ला समूहाने ब्रँडेड दागिन्यांच्या व्यवसायात अशा वेळी प्रवेश केला आहे जेव्हा देशात ब्रँडेड दागिन्यांचे आकर्षण वाढले आहे. ग्राहकांचा मोठा वर्ग आता पारंपरिक सराफ दुकानांऐवजी ब्रँडेड दागिने खरेदी करण्यास प्राधान्य देत आहे.

Aditya Birla
Tata Group: रतन टाटा मालामाल! 5 मिनिटांत कमावले 22,450 कोटी, केला नवा विक्रम

या सेगमेंटमध्ये आधीच अस्तित्वात असलेल्या अनेक दिग्गजांशी बिर्ला यांची थेट स्पर्धा होणार आहे. तनिष्क ब्रँडच्या माध्यमातून टाटा ग्रुप, रिलायन्स ज्वेलर्सच्या माध्यमातून रिलायन्स ग्रुप व्यतिरिक्त, कल्याण ज्वेलर्स, जॉयलुक्कास, मलबार इत्यादी ब्रँड्स ब्रँडेड दागिन्यांच्या या व्यवसायात आधीपासूनच आहेत.

त्यामुळे ग्राहकांना या कंपन्यांच्या स्पर्धांचा मोठा फायदा होणार आहे. कारण आगामी काळात या कंपन्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी मोठ्या ऑफर्स देण्याची शक्यता आहे. त्यामुळे सणासुदीच्या काळात ग्राहकांची चांदी होऊ शकते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.