Vedanta Group: अदानीनंतर आता वेदांत ग्रुपवर OCCRPचा घाला, जावडेकरांवरही केले गंभीर आरोप

Vedanta Group: अदानीनंतर आता वेदांत ग्रुपवर OCCRP ने आरोप केले आहेत.
Vedanta Group
Vedanta GroupSakal
Updated on

Vedanta Group: अदानीनंतर आता वेदांत ग्रुपवर OCCRP ने आरोप केले आहेत. माध्यम संस्था OCCRP ने भारतीय उद्योगपती वेदांत समूहाचे मालक अनिल अग्रवाल यांना टार्गेट केले आहे. रॉयटर्सने दिलेल्या माहितीनुसार, अनिल अग्रवाल यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

ओसीसीआरपीचा आरोप आहे की, कंपनी वेदांतने कोरोनाच्या काळात पर्यावरणीय कायदे कमकुवत करण्यासाठी गुप्तपणे लॉबिंग केले होते.

अहवालात म्हटले आहे की जानेवारी 2021 मध्ये, वेदांत समूहाच्या अध्यक्षांनी तत्कालीन पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांना पर्यावरण नियमांची मंजुरी न घेता खाण कंपन्यांना उत्पादनात 50 टक्के वाढ करण्याची परवानगी देण्यास सांगितले होते.

Vedanta Group
Mukesh Ambani: कुठे सीईओ मिळेल का? नवीन कंपनीसाठी अंबानी सीईओच्या शोधात

काय आहेत आरोप?

OCCRP अहवालात असे म्हटले आहे की राजस्थानमधील CARES चे सहा वादग्रस्त तेल प्रकल्प स्थानिक विरोधाला न जुमानता मंजूर करण्यात आले आहेत.

जानेवारी 2021 मध्ये अनिल अग्रवाल यांनी तत्कालीन पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांना पत्र लिहून खाण कंपन्यांना नवीन पर्यावरणीय मंजुरी न घेता 50 टक्क्यांपर्यंत उत्पादन वाढवण्याची परवानगी मागितली होती.

OCCRP अहवालानुसार, अग्रवाल यांनी सांगितले होते की, या प्रकल्पांमधून सरकारला प्रचंड महसूल मिळेल आणि मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्माण होईल.

Vedanta Group
Yes Bank-DHFL Case: अविनाश भोसले यांना रुग्णालयात का हलवले? प्रकृतीत सुधारणा का नाही? कोर्टाने मागवला रिपोर्ट..

गौतम अदानींना केले होते टार्गेट

वेदांतापूर्वी OCCRP ने गौतम अदानी यांनाही टार्गेट केले होते. OCCRP ने दावा केला होता की अदानी ग्रुपने स्वतःचे शेअर्स गुपचूप खरेदी करून स्टॉक एक्स्चेंजमध्ये लाखो डॉलर्सची गुंतवणूक केली होती. मात्र, अदानी समूहाने ओसीसीआरपीचे सर्व आरोप फेटाळून लावले होते.

पण, OCCRP अहवालामुळे अदानी समूहाच्या शेअर्समध्ये मोठी घसरण नोंदवण्यात आली. अदानी समूहाच्या मार्केट कॅपमध्ये सुमारे 40 हजार कोटी रुपयांची घट झाली. त्याचबरोबर जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत गौतम अदानी आता 20 व्या स्थानावरून 22 व्या स्थानावर घसरले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.