Deepfake Video: गुंतवणूकदारांनो सावधान! बीएसई चीफचा डीपफेक व्हिडिओ होतोय व्हायरल; होऊ शकते लाखोंचे नुकसान

BSE Deepfake Video: तंत्रज्ञानाचा धोका आता शेअर बाजारातील गुंतवणूकदारांपर्यंतही पोहोचत आहे. देशातील प्रमुख स्टॉक एक्सचेंज बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) चे एमडी आणि सीईओ सुंदररामन राममूर्ती यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.
After NSE, BSE cautions against fake video of its chief recommending stocks
After NSE, BSE cautions against fake video of its chief recommending stocks Sakal
Updated on

BSE Deepfake Video: तंत्रज्ञानाचा धोका आता शेअर बाजारातील गुंतवणूकदारांपर्यंतही पोहोचत आहे. देशातील प्रमुख स्टॉक एक्सचेंज बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचे (BSE) एमडी आणि सीईओ सुंदररामन राममूर्ती यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ डीपफेक टेक्नॉलॉजीने बनवण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. असा व्हिडिओ तुमच्याही समोर आला असेल, तर सावध रहा. अन्यथा तुमचे मोठे नुकसान होऊ शकते.

एनएसई नंतर, बीएसईने देखील गुंतवणूकदारांना सुंदररामन राममूर्ती यांच्या शेअर्सची शिफारस करणाऱ्या डीपफेक व्हिडिओबद्दल इशारा दिला आहे. बीएसईने गुरुवारी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की काही व्हिडिओ आणि ऑडिओ त्यांच्या निदर्शनास आले आहेत ज्यात त्यांचे अधिकारी कथितपणे काही शेअर्स आणि गुंतवणुकीबद्दल सूचना देताना दिसत आहेत.

After NSE, BSE cautions against fake video of its chief recommending stocks
Nestle Baby Products: नेस्ले कंपनी सरकारच्या रडारवर; अहवालात मोठा खुलासा, बेबी फूडमध्ये मिसळली साखर

बीएसई एमडीचा डीपफेक व्हिडिओ व्हायरल

एक्सचेंजने हे व्हिडिओ आणि ऑडिओ बनावट, अनधिकृत आणि फसवे असल्याचे म्हटले आहे आणि ते अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून तयार केले असल्याचे म्हटले आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) वापरून मूळ व्हिडिओमध्ये फेरफार करून डीपफेक व्हिडिओ तयार केले जातात. त्यामुळे चुकीची माहिती पसरून संबंधित व्यक्तीच्या प्रतिष्ठेला तडा जाण्याचा धोका आहे.

एनएसईनेही दिला होता इशारा

यापूर्वी, 10 एप्रिल रोजी, नॅशनल स्टॉक एक्स्चेंजने (NSE) देखील शेअर्सच्या शिफारसींसह त्यांचे एमडी आणि सीईओ आशिष कुमार चौहान यांच्या डीपफेक व्हिडिओविरूद्ध सावधगिरीचा इशारा दिला होता. (After NSE, BSE cautions against fake video of its chief recommending stocks)

After NSE, BSE cautions against fake video of its chief recommending stocks
Share Market Opening: मध्यपूर्वेतील वाढत्या तणावात सेन्सेक्स 600 अंकांनी घसरला; कोणते शेअर्स वधारले?

डीपफेक तंत्रज्ञानामध्ये, संगणक एआय आणि मशीन लर्निंग वापरून एखाद्या व्यक्तीचा चेहरा, हावभाव आणि आवाज अचूकपणे कॉपी केला जातो. यानंतर, त्या व्यक्तीचा चेहरा, आवाज वापरून दिशाभूल करणारी माहिती पसरवली जाऊ शकते. याआधीही अनेक सेलिब्रिटी या तंत्रज्ञानाचे बळी ठरले आहेत.

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा. किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.