Hinduja Group: हिंदुजा समूहाचे अध्यक्ष श्रीचंद परमानंद हिंदुजा यांचे बुधवारी लंडनमध्ये निधन झाले. काही दिवसांपासून ते आजारी होते. हिंदुजा भावांमध्ये ते सर्वात मोठे होते. हिंदुजा समूह अजूनही ब्रिटनमधील सर्वात श्रीमंत समूहांमध्ये आहे.
2022 च्या फोर्ब्सच्या जगातील श्रीमंतांच्या यादीत हे कुटुंब 146 व्या क्रमांकावर होते. 109 वर्षे जुना समूह आता प्रसिद्धीच्या झोतात आला आहे. कारण हिंदुजा कुटुंबात मालमत्तेच्या विभागणीवरून वाद आहेत.
दुसरीकडे या वादामुळे कुटुंबातील मोठा भाऊ श्रीचंद हिंदुजा यांच्या प्रकृतीची काळजी न घेतल्याची बाबही समोर आली आहे.
हिंदुजा समूहात काय आहे वाद?
मालमत्ता वाटपाशी संबंधित हा वाद नऊ वर्षे जुना आहे. खरं तर, 2014 मध्ये हिंदुजा ग्रुपचे संस्थापक दीपचंद हिंदुजा यांची चार मुले श्रीचंद, गोपीचंद, प्रकाश आणि अशोक यांच्यात एक करार झाला होता.
एका भावाच्या नावावर असलेली मालमत्ता एकाची नसून चार भावांची असेल, असे सांगण्यात आले. हा करार वादाचे मूळ आहे.
सेटलमेंटच्या सुमारे एक वर्षानंतर, हिंदुजा बंधूंमधले ज्येष्ठ श्रीचंद हिंदुजा यांनी स्वित्झर्लंडच्या हिंदुजा बँकेवर एकट्या मालकीचा दावा केला. यासाठी त्यांनी त्यांच्या अन्य तीन भावांविरुद्ध उच्च न्यायालयात खटला दाखल केला होता.
हिंदुजा समूहाचा 109 वर्षांचा इतिहास:
भारतातील सिंध प्रांतातील शिकारपूर जिल्ह्यात जन्मलेल्या दीपचंद हिंदुजा यांनी हिंदुजा समूह सुरू केला होता. 1914 मध्ये, दीपचंद देशाची आर्थिक राजधानी मुंबईला गेले आणि पुढे त्यांनी सिंधमध्ये आल्यावर व्यवसाय सुरू केला.
1919 मध्ये दीपचंद यांनी आपला व्यवसाय वाढवला आणि इराणमध्ये पहिले आंतरराष्ट्रीय कार्यालय सुरु केले. हा समूह इराणमधून 1979 पर्यंत कार्यरत राहिला. इराणमधील 1979 च्या इस्लामिक क्रांतीनंतर, समूहाने आपले मुख्यालय लंडनला हलवले. तरीही या समूहाचे केंद्र फक्त ब्रिटनमध्ये आहे.
दीपचंद हिंदुजा यांनी सुरू केलेला हा समूह त्यांचे पुत्र श्रीचंद हिंदुजा, गोपीचंद, प्रकाश आणि अशोक हिंदुजा यांनी पुढे नेला. दीपचंद हिंदुजा यांचा ज्येष्ठ मुलगा श्रीचंद हे हिंदुजा समूह, हिंदुजा बँक ऑफ स्वित्झर्लंड आणि हिंदुजा फाउंडेशनचे अध्यक्ष होते.
दुसरा मुलगा गोपीचंद हे हिंदुजा समूहाचे सह-अध्यक्ष आणि हिंदुजा ऑटोमोटिव्ह लिमिटेड, यूकेचे अध्यक्ष आहेत. प्रकाश हिंदुजा हे हिंदुजा ग्रुपचे (युरोप) अध्यक्ष आहेत. अशोक हिंदुजा हे हिंदुजा ग्रुप ऑफ कंपनीज (भारत) चे अध्यक्ष आहेत.
हिंदुजा ग्रुप कोणत्या क्षेत्रात व्यवसाय करतो?
हिंदुजा ग्रुप बँकिंग आणि फायनान्स, आयटी, पॉवर, ऑटोमोटिव्ह, ऑइल आणि स्पेशालिटी केमिकल्स, रिअल इस्टेट, हेल्थ केअर, प्रोजेक्ट डेव्हलपमेंट, ट्रेडिंग, सायबर सिक्युरिटी ते मीडिया या क्षेत्रांमध्ये कार्यरत आहे.
हा समूह जगातील सर्वात मोठ्या वैविध्यपूर्ण समूहांपैकी एक आहे. अशोक लेलँड्स, भारतातील ट्रक बनवणारी कंपनी आणि बँकिंग व्यवसायाशी संबंधित इंडसइंड बँक या समूहाअंतर्गत येतात.
याशिवाय देशातील अनेक शहरांमध्ये रिअल इस्टेटमध्येही या ग्रुपचे काम आहे. कंपनी मुंबईतील हिंदुजा हॉस्पिटल आणि कॉलेज देखील चालवते. कंपनीत दीड लाखांहून अधिक लोक काम करतात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.