अर्थसंकल्पापूर्वी IMFने दिली आनंदाची बातमी! 2024मध्ये आर्थिक विकास दर 6.5 टक्के राहण्याचा अंदाज

IMF Upgrades India GDP Economic Growth Rate: IMF म्हणजेच आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने आर्थिक वर्ष 2024-25 साठी भारताच्या GDP वाढीचा अंदाज वाढवला आहे. IMF ने म्हटले आहे की येत्या आर्थिक वर्षात भारतीय अर्थव्यवस्था 6.5 टक्के वेगाने वाढेल.
Ahead of Budget, IMF raises India's FY25, FY26 GDP growth forecasts to 6.5 percent
Ahead of Budget, IMF raises India's FY25, FY26 GDP growth forecasts to 6.5 percentSakal
Updated on

IMF Upgrades India GDP Growth: 1 फेब्रुवारी रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारामन मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळासाठी अंतरिम अर्थसंकल्प सादर करणार आहेत. अंतरिम अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी, भारतीय अर्थव्यवस्थेबद्दल एक चांगली बातमी आली आहे.

IMF म्हणजेच आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने आर्थिक वर्ष 2024-25 साठी भारताच्या GDP वाढीचा अंदाज वाढवला आहे. IMF ने म्हटले आहे की येत्या आर्थिक वर्षात भारतीय अर्थव्यवस्था 6.5 टक्के वेगाने वाढेल. याआधी ऑक्टोबर 2023 मध्ये IMF ने भारताचा GDP वाढीचा दर 6.3 टक्के असण्याचा अंदाज वर्तवला होता, परंतु आता तो 20 आधार अंकांनी वाढवून 6.5 टक्के केला आहे.

चालू आर्थिक वर्षातही IMF ने भारताचा विकासदर 6.7 टक्क्यांपर्यंत वाढवला आहे. याशिवाय IMF ने जागतिक वाढीचा अंदाज 20 आधार अंकांनी वाढवून 3.1 टक्के केला आहे. (IMF Upgrades India GDP Growth)

Ahead of Budget, IMF raises India's FY25, FY26 GDP growth forecasts to 6.5 percent
NPS Rules: NPS खात्यातून पैसे काढण्याचे नियम बदलणार, 1 फेब्रुवारीपासून 'ही' सुविधा होणार बंद

इतर देशांची स्थिती काय आहे?

वृत्तसंस्था ANI च्या अहवालानुसार, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने 2024 साठी इतर प्रमुख अर्थव्यवस्थांच्या कामगिरीचा अंदाज लावला आहे. IMF नुसार अमेरिकेचा विकास दर 2.1 टक्के, जर्मनीचा विकास दर 0.5 टक्के, फ्रान्सचा विकास दर 1 टक्के, जपानचा विकास दर 0.9 टक्के आणि चीनचा विकास दर 4.6 टक्के असेल.

Ahead of Budget, IMF raises India's FY25, FY26 GDP growth forecasts to 6.5 percent
Zee-Sony Merger : ‘सोनी’ला राष्ट्रीय लवादाची नोटीस; ‘झी-सोनी’ विलीनीकरणप्रकरणी आंतरराष्ट्रीय लवादासमोर आज सुनावणी

अर्थ मंत्रालयानेही चांगल्या वाढीचा अंदाज व्यक्त केला होता

यापूर्वी, अर्थ मंत्रालयाने सोमवारी आपल्या मासिक अहवालात म्हटले होते की, 'या एप्रिलपासून सुरू होणाऱ्या आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये भारतीय अर्थव्यवस्था सुमारे 7 टक्क्यांनी वाढण्याची अपेक्षा आहे. देशांतर्गत मागणीमुळे गेल्या तीन वर्षांत अर्थव्यवस्था 7 टक्क्यांहून अधिक वाढली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.