Air India: एअर इंडियाने रचला इतिहास, अगोदर A350 विमानाचे अधिग्रहण केले पूर्ण, आता...

Air India: एअर इंडिया असा करार करणारी पहिली एअरलाइन बनली आहे.
Air India
Air IndiaSakal
Updated on

Air India: एअर इंडियाने शुक्रवारी सांगितले की त्यांनी गिफ्ट सिटीद्वारे पहिल्या A350-900 विमानांचे अधिग्रहण पूर्ण केले आहे. हे अधिग्रहण HSBC सह फायनान्स लीज व्यवहाराद्वारे करण्यात आले आहे.

एअर इंडियाने एक निवेदन जारी करून सांगितले की, हा व्यवहार एअर इंडियाची उपकंपनी एआय फ्लीट सर्व्हिसेस लिमिटेडने केला आहे. एअर इंडियाच्या 470 विमानांसाठीचा हा पहिला व्यवहार आहे. एअर इंडिया असा करार करणारी पहिली एअरलाइन बनली आहे.

Air India
Insurance Companies: देशातील 6 विमा कंपन्यांना 3 हजार कोटींची नोटीस; काय आहे प्रकरण?

एअर इंडियाच्या अधिकाऱ्याने ही माहिती दिली

एअर इंडियाचे चीफ कमर्शिअल आणि ट्रान्सफॉर्मेशन ऑफिसर निपुण अग्रवाल म्हणाले, हा महत्त्वाचा व्यवहार GIFT IFSC कडून विमान भाडेतत्त्वावर घेण्याच्या व्यवसायाची सुरुवात आहे.

AIFS ही 'वाइड बॉडी' एअरक्राफ्ट फायनान्सिंगसाठी एअर इंडिया ग्रुपची पहिली संस्था असेल, जी आमच्यासाठी आणि आमच्या सहाय्यक कंपन्यांसाठी भविष्यातील विमान वित्तपुरवठा धोरणात महत्त्वाची भूमिका बजावेल.

Air India
Adani Group: गौतम अदानींना मोठा धक्का; 'ही' कंपनी अदानी ग्रुपमधील हिस्सेदारी विकणार, काय आहे प्रकरण?

टाटा एअरलाइन्सचा व्यवसाय वाढेल

एअर इंडियाने या विमानांच्या खरेदीसाठी एअरबस आणि बोईंगसोबत या वर्षी जूनमध्ये खरेदी करार केला होता. सध्या एअर इंडियाकडे 116 विमानांचा ताफा आहे, ज्यात 49 'वाइड बॉडी' विमानांचा समावेश आहे.

टाटा समूह आपला एअरलाइन व्यवसाय मजबूत करण्याची योजना आखत आहे, ज्या अंतर्गत AIX Connect एअर इंडिया एक्सप्रेसमध्ये विलीन केले जात आहे आणि विस्तारा एअर इंडियामध्ये विलीन केले जाईल. विस्तारा ही टाटा आणि सिंगापूर एअरलाइन्स यांच्यातील संयुक्त उपक्रम आहे आणि सिंगापूर एअरलाइन्सची 49 टक्के भागीदारी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.