Air India Express Flights Cancelled: तुम्ही एअर इंडिया एक्सप्रेसचे विमान तिकीट बुक केले असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. एअर इंडिया एक्सप्रेसच्या 70 हून अधिक आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. फ्लाइट रद्द होण्याचे कारण म्हणजे कर्मचारी रजेवर गेले आहेत आणि ते आजारी आहेत असे कारण त्यांनी दिले आहे. ही उड्डाणे मंगळवारी रात्री ते बुधवारी सकाळदरम्यान रद्द करण्यात आली आहेत. नागरी विमान वाहतूक प्राधिकरण या प्रकरणाची चौकशी करत असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
एअर इंडिया एक्सप्रेसच्या प्रवक्त्याने सांगितले की, काही केबिन क्रू मेंबर्स काल रात्रीपासून अचानक आजारी पडले. त्यामुळे काही उड्डाणे रद्द करावी लागली. हे का घडले हे जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत? पण यामुळे प्रवाशांची कमीत कमी गैरसोय व्हावी, असा आमचा प्रयत्न आहे. एअर इंडिया एक्सप्रेसने प्रवाशांना अचानक झालेल्या गैरसोयीबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, एअर इंडिया एक्सप्रेसने अचानक झालेल्या गैरसोईबद्दल प्रवाशांची माफी मागितली आणि परतावा देण्याची घोषणा केली आहे. कंपनीच्या क्रू मेंबर्सशी चर्चा सुरू असल्याची माहिती एअरलाइन्सच्या प्रवक्त्याने दिली.
काही वाद असल्यास ते लवकरच सोडवले जातील. प्रवाशांना त्यांचा परतावा लवकरच दिला जाईल. लवकरच फ्लाइट सुरु होतील. अशा परिस्थितीत, ज्या प्रवाशांना त्यांच्या फ्लाइटचे वेळापत्रक बदलायचे आहे ते कळवू शकतात. कोणतेही अतिरिक्त शुल्क न आकारता फ्लाइटचे वेळापत्रक रीशेड्युल केले जाईल. अशी माहिती एअर इंडिया एक्सप्रेसने दिली आहे.
एअर इंडिया एक्सप्रेस ही एअर इंडियाची उपकंपनी आहे. नोव्हेंबर 2022 मध्ये एअर इंडियाने ती विकत घेतली. एअरलाइन्सकडे 28 एअरबस, 26 बोइंग आणि 737 विमाने आहेत. ही विमान कंपनी जवळपास संपूर्ण देशात आपली सेवा पुरवते, परंतु आता अचानक क्रू मेंबर्सचे संकट अधिक गडद झाल्याने ही विमान कंपनी प्रसिद्धीच्या झोतात आली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.