Tata Group: टाटांच्या कंपनीत होतोय भेदभाव; कर्मचारी संघटनेने केला आरोप, वरिष्ठांना लिहिले पत्र

Air India Express: टाटा समूहाची विमान कंपनी विस्तारा नुकतीच मोठ्या संकटात सापडली होती. विस्ताराचे पायलट सामूहिक सुट्टीवर गेले होते आणि एअरलाईनला त्यांची अनेक उड्डाणे रद्द करावी लागली होती. आता ग्रुपची दुसरी एअरलाइन एअर इंडिया एक्सप्रेसवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.
Air India Express employee union staff flag concerns alleged mismanagement at airline
Air India Express employee union staff flag concerns alleged mismanagement at airline Sakal
Updated on

Air India Express: टाटा समूहाची विमान कंपनी विस्तारा नुकतीच मोठ्या संकटात सापडली होती. विस्ताराचे पायलट सामूहिक सुट्टीवर गेले होते आणि एअरलाईनला त्यांची अनेक उड्डाणे रद्द करावी लागली होती. आता ग्रुपची दुसरी एअरलाइन एअर इंडिया एक्सप्रेसवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.

विमान कंपनीचे व्यवस्थापन योग्य पद्धतीने केले जात नसल्याचा आरोप केबिन क्रूने केला आहे. तसेच कर्मचाऱ्यांना समान वागणूक दिली जात नाही. कर्मचाऱ्यांशी भेदभाव होत असल्याचा आरोप कंपनीवर करण्यात आला आहे. यासंदर्भातील पत्र टाटा समूह आणि एअर इंडियाचे अध्यक्ष एन चंद्रशेखरन यांना पाठवण्यात आले आहे.

Air India Express employee union staff flag concerns alleged mismanagement at airline
Startup: मालक असावा तर असा! स्टार्टअप पडले बंद; पण कंपनीच्या मालकाने कर्मचाऱ्यांना केले मालामाल

एअर इंडिया एक्सप्रेस आणि एआयएक्स कनेक्टच्या विलीनीकरणाची प्रक्रिया सुरू आहे. AIX Connect पूर्वी AirAsia India म्हणून ओळखले जात असे. एअर इंडिया एक्सप्रेस एम्प्लॉईज युनियनने (AIXEU) 26 एप्रिल रोजी एन चंद्रशेखरन यांना हे तक्रार करणारे पत्र पाठवले आहे. त्याची प्रत एअर इंडिया एक्स्प्रेसचे सीईओ अलोक सिंग आणि इतरांनाही पाठवण्यात आली आहे.

सुमारे 300 कर्मचाऱ्यांकडून या तक्रारी आल्या असल्याचा दावा युनियनने केला आहे. व्यवस्थापनाच्या चुकीच्या वागणुकीमुळे कर्मचाऱ्यांच्या मानसिकतेवर विपरीत परिणाम होतो.

विमान कंपनीतील वरिष्ठ पदांसाठी मुलाखती दिलेल्या कर्मचाऱ्यांची कामगिरी चांगली असूनही नियुक्ती करण्यात आली नाही. याशिवाय एचआरएसह अनेक भत्तेही काढून टाकण्यात आले आहेत. त्यामुळे विमान कंपनी नफ्यात असूनही कर्मचाऱ्यांचे पगार कमी झाले आहेत. या पत्रावर प्रशासनाकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

Air India Express employee union staff flag concerns alleged mismanagement at airline
Poorest Politicians: भारतातील सर्वात गरीब 'पुढारी' कोण आहेत? ज्यांच्याकडे आहे फक्त 1,700 रुपयांची मालमत्ता

प्रशासन आंदोलन करणाऱ्यांचा आवाज दाबत आहे

व्यवस्थापन आंदोलन करणाऱ्यांचा आवाज दाबत असल्याचा आरोप पत्रात करण्यात आला आहे. कर्मचाऱ्यांच्या समस्या ऐकून घेतल्या जात नाहीत. एअर इंडिया एक्सप्रेसमध्ये अंदाजे 2000 केबिन क्रू मेंबर आहेत. टाटा समूहाने 2022मध्ये एअर इंडियाकडून एअर इंडिया एक्स्प्रेस विकत घेतली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.