Air India Express: एअर इंडिया एक्सप्रेसची खास ऑफर! स्वस्तात करता येणार विमान प्रवास; पाहा तिकीटाचे दर

Air India Express Freedom Sale: देशाच्या स्वातंत्र्याच्या 77 व्या वर्धापन दिनानिमित्त, टाटा समूहाची एअरलाइन एअर इंडिया एक्सप्रेसने फ्रीडम सेलची घोषणा केली आहे.
Air India Express
Air India ExpressSakal
Updated on

Air India Express Freedom Sale: देशाच्या स्वातंत्र्याच्या 77 व्या वर्धापन दिनानिमित्त, टाटा समूहाची एअरलाइन एअर इंडिया एक्सप्रेसने फ्रीडम सेलची घोषणा केली आहे. स्वातंत्र्य दिनापूर्वीच विमान कंपनी प्रवाशांना केवळ 1947 रुपयांमध्ये प्रवास करण्याची सुवर्णसंधी देत ​​आहे. या ऑफरचा लाभ घेण्यासाठी प्रवासी 5 ऑगस्टपर्यंत बुकिंग करू शकतात.

फ्रीडम सेल ऑफर फक्त या मार्गांवर उपलब्ध असेल

एअर इंडिया एक्सप्रेसने प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की ही ऑफर 15 आंतरराष्ट्रीय आणि 32 देशांतर्गत मार्गांवर उपलब्ध आहे. यामध्ये दिल्ली-जयपूर, बेंगळुरू-गोवा आणि दिल्ली-ग्वाल्हेर या प्रमुख मार्गांचा समावेश आहे. या मार्गांवर प्रवासी या ऑफरचा लाभ घेऊ शकतात.

बुकिंग तारीख

ही विक्री 5 ऑगस्ट 2024 पर्यंत ग्राहकांसाठी लागू असल्याची माहिती एअरलाइनने दिली. प्रवासी 20 ऑगस्ट ते 30 सप्टेंबर 2024 दरम्यान प्रवासासाठी बुकिंग करू शकतात. ऑफरचा लाभ घेण्यासाठी हवाई प्रवाशांना 5 ऑगस्टपूर्वी त्यांचे बुकिंग करावे लागेल.

Air India Express
Freebies: रेवडी योजना बंद होणार? मोदी सरकारच्या वरिष्ठ अधिकाऱ्याचा इशारा, पीएम किसानवर येणार गदा?

या कालावधीत प्रवासी एक्सप्रेस लाईटचे भाडेही बुक करू शकतात. यासाठी प्रवाशांना विमान कंपनीच्या वेबसाइटवरून तिकीट बुक करावे लागेल. या अंतर्गत तुम्ही शून्य चेक-इन बॅगेज शुल्काचा लाभ घेऊ शकता.

एक्सप्रेस लाइटच्या भाड्यामध्ये कोणतेही शुल्क न घेता अतिरिक्त 3 किलो केबिन बॅगेजची प्री-बुकिंग करण्याचा पर्याय आणि देशांतर्गत फ्लाइटसाठी 15 किलोसाठी 1000 रुपये आणि आंतरराष्ट्रीय फ्लाइटमध्ये 20 किलोसाठी 1300 रुपये सवलतीचे चेक-इन बॅगेज शुल्काचा समावेश आहे.

Air India Express
Tata Sons: टाटांचा प्लॅन RBIने मान्य केला नसता तर.., शेअर बाजारच नव्हे तर अर्थव्यवस्थेतही उडाला असता गोंधळ

एअर इंडियाचे लॉयल्टी सदस्य असणाऱ्यांना अतिरिक्त सवलत मिळेल. लॉयल्टी सदस्य एअर इंडियाच्या वेबसाइटवरून केलेल्या तिकीट बुकिंगवर 8% पर्यंत न्यूकॉइन मिळवू शकतात.

याशिवाय, तुम्ही ॲड-ऑन पॅकवर बिझ आणि प्राइम सीट, जेवण, थंड पेय आणि मिठाईचा आनंद घेऊ शकता. विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, डॉक्टर, परिचारिका आणि सशस्त्र दलाचे सदस्य देखील या सवलतीचा लाभ घेऊ शकतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.