Air India Express: टाटा एअरलाइन्सची खास ऑफर; मतदान करणाऱ्यांना करता येणार स्वस्तात प्रवास

Air India Express: देशात लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी आज म्हणजेच 19 एप्रिलपासून मतदानाला सुरुवात झाली आहे. देशातील एअर इंडिया एक्सप्रेसने मतदानाचा प्रचार करण्यासाठी मोठी घोषणा केली आहे.
Air India Express offers discount to first-time voters
Air India Express offers discount to first-time voters Sakal
Updated on

Air India Express: देशात लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी आज म्हणजेच 19 एप्रिलपासून मतदानाला सुरुवात झाली आहे. देशातील एअर इंडिया एक्सप्रेसने मतदानाचा प्रचार करण्यासाठी मोठी घोषणा केली आहे.

एअरलाइन प्रथमच मतदारांसाठी (18-22 वर्षे) तिकिटांवर विशेष सवलत देईल. जे लोक पहिल्यांदा मतदान करण्यासाठी त्यांच्या घरी जात आहेत त्यांना विमान तिकिटावर 19 टक्क्यांपर्यंत सूट मिळणार आहे.

लोकांना मतदानाबाबत जागरूक करण्यासाठी एअर इंडिया एक्सप्रेसने #VoteAsYouAre मोहीम सुरू करण्याची घोषणा केली होती. या मोहिमेअंतर्गत, एअरलाइन्स 18 ते 22 वर्षे वयोगटातील तरुणांना सवलत देत आहेत जे प्रथमच त्यांच्या मताधिकाराचा वापर करतील.

कंपनीने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मतदाराला संबंधित मतदारसंघाच्या जवळच्या विमानतळावर जाण्यासाठी ही सूट मिळेल. ही सूट 18 एप्रिल ते 1 जून 2024 या कालावधीतच उपलब्ध असेल. सवलतीच्या तिकिटांचे बुकिंग एअरलाइनचे मोबाइल ॲप आणि वेबसाइट https://www.airindiaexpress.com द्वारे केले जाऊ शकते.

Air India Express offers discount to first-time voters
Godrej Group: 127 वर्ष जुन्या गोदरेज ग्रुपमध्ये वाटण्या सुरु; कुटुंबीयांनी घेतला मोठा निर्णय, काय आहे प्रकरण?

एअर इंडिया एक्स्प्रेसचे सीईओ अंकुर गर्ग म्हणतात की एअर इंडिया एक्सप्रेसने नेहमीच समाजातील बदलासाठी काम केले आहे. कंपनी 19 व्या वर्धापन दिनाच्या तयारीत आहे. अशा वातावरणात कंपनीने आपला खास उपक्रम #VoteAsYouAre मोहीम सुरू केली आहे.

Air India Express offers discount to first-time voters
Deepfake Video: गुंतवणूकदारांनो सावधान! बीएसई चीफचा डीपफेक व्हिडिओ होतोय व्हायरल; होऊ शकते लाखोंचे नुकसान

ऑफरसाठी मतदार ओळखपत्र दाखवणे आवश्यक

एअर इंडिया एक्सप्रेसच्या या ऑफरचा लाभ घेण्यासाठी, ग्राउंड स्टाफला तुमचे मतदार ओळखपत्र दाखवणे आवश्यक आहे. विमानतळावर बोर्डिंग पास घेताना ग्राहकांना त्यांचे मतदार ओळखपत्र दाखवावे लागेल.

देशभरात 31 ठिकाणी कंपनीची सेवा

टाटा समूहाची विमान वाहतूक कंपनी एअर इंडिया एक्स्प्रेस भारतातील 31 स्थळांसाठी उड्डाण करते. यामध्ये पंजाबचे अमृतसर, उत्तर प्रदेशचे अयोध्या, दिल्ली, गोवा, गुवाहाटी, ग्वाल्हेर, हैदराबाद, मणिपूरचे इंफाळ, इंदूर, मध्य प्रदेशचे जयपूर, केरळचे कन्नूर, कोची आणि कोझिकोड, कोलकाता, लखनौ, श्रीनगर, रांची, पुणे, मुंबई, वाराणसी आदींचा समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.