Airfares: 'विमानाच्या तिकीट दरांवर नियंत्रण ठेवा, प्रवाशांचे हित लक्षात घ्या', शिंदे यांचा विमान कंपन्यांना सल्ला

हवाई प्रवाशांची संख्या, विमान भाडे आणि प्रवाशांच्या हितासाठी उचललेली पावले यावर केंद्र सरकारने संसदेत प्रश्नांची उत्तरे दिली.
Airfares
AirfaresEsakal
Updated on

हवाई प्रवाशांची संख्या, विमान भाडे आणि प्रवाशांच्या हितासाठी उचललेली पावले यावर केंद्र सरकारने संसदेत माहिती दिली. सरकारने लोकसभेत सांगितले की, गेल्या नऊ वर्षांत हवाई प्रवाशांची संख्या 14 कोटी झाली आहे. 2023 पर्यंत हा आकडा तीन पटीने वाढून 42 कोटींवर जाऊ शकतो. याशिवाय नागरी उड्डाण मंत्रालयाने विमान भाड्याबाबत विमान कंपन्यांशी चर्चा केली आहे. त्यांना भाडे ठरवताना प्रवाशांचे हित लक्षात ठेवण्याचा सल्ला देण्यात आला आहे. या काळात भाडे नियंत्रणात ठेवण्याचा सल्लाही देण्यात आला.(Latest Marathi News)

नागरी उड्डाण मंत्रालयाने विमानभाड्यांबाबत विमान कंपन्यांशी चर्चा केली आहे. भाडे निश्चित करताना त्यांना प्रवाशांचे हित लक्षात ठेवण्याचा सल्ला देण्यात आला आहे, असे विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी गुरुवारी सांगितले आहे. सरकार लोकसभेत विमान भाड्यात झालेली वाढ आणि या समस्येचे निराकरण करण्यासाठी सरकारने उचललेली पावले याबद्दलच्या लेखी प्रश्नाला उत्तर देताना शिंदे यांनी हे विधान केले आहे.

Airfares
Agriculture Minister: नरेंद्र सिंह तोमर यांच्यासह दोन मंत्र्यांचे राजीनामे मंजूर; अर्जुन मुंडा भारताचे नवे कृषीमंत्री

"मार्केट, मागणी, हंगाम आणि मार्केटमधील इतर घटक लक्षात घेऊन विमान कंपन्यांकडून भाडे निश्चित केले जाते. जागांच्या मागणीत वाढ झाल्याने विमानभाडे वाढते असंही ते यावेळी म्हणालेत.

शिंदे यांनी सांगितले की, मंत्रालयाने विमान कंपन्यांशी सल्लामसलत केली आहे आणि प्रतिनिधींना विमान भाडे निश्चित करताना प्रवाशांचे हित लक्षात ठेवण्याचा सल्ला देण्यात आला आहे. (Latest Marathi News)

Airfares
Ravishankar Prasad : दक्षिण आणि उत्तर भारत असा विभाजनाचा काँग्रेसचा प्रयत्न

" नैसर्गिक आपत्ती, किंवा इतर आपत्ती इत्यादी सारख्या घटनांमध्ये विमान भाडे वाढणार नाही याची खात्री करण्यासाठी एअरलाइन्स वचनबद्ध आहेत," असंही ते यावेळी म्हणाले.(Latest Marathi News)

'विविध देशांमध्ये मागणी आणि पुरवठा या बाजाराच्या तत्त्वाचे पालन करतात, एखाद्या विशिष्ट फ्लाइटमध्ये आधीच विकल्या गेलेल्या सीटची संख्या, इंधनाची किंमत, त्या मार्गावर असणाऱ्या विमानाची क्षमता, स्पर्धा, हंगाम, सुट्ट्या, सण, विकेंड, कार्यक्रम (खेळ, स्पर्धा) इत्यादी घटकांवर भाडेवाढ अवलंबून असतात, असंही ते पुढे म्हणालेत.

Airfares
Narendra Modi : मी मोदी आहे, मला मोदीजी म्हणून बोलावू नका

जागतिक स्तरावर, बहुतेक देशांनी त्यांचे विमान वाहतूक क्षेत्र नियंत्रणमुक्त केले आहे. सरकारने लादलेले निर्बंध आणि एअरलाइन्सवरील किंमतीचे निर्बंध काढून टाकले आहेत. नियंत्रणमुक्तीमुळे विमान वाहकांमधील स्पर्धा वाढली आहे, ज्यामुळे विमान भाडे कमी झाले आहे.

"नवीन विमान कंपनीसाठी एअरलाइन्स उद्योगात प्रवेश करणे सोपे झाले आहे, परिणामी अनेक नवीन एअरलाइन्स मार्केटमध्ये प्रवेश करत आहेत, त्यामुळे स्पर्धा वाढत आहे", असंही शिंदे यावेळी म्हणाले आहेत.

Airfares
Assembly Election Results 2023 : पराभूत राज्यांमध्ये काँग्रेस घेणार मोठा निर्णय; राजस्थानमध्ये गहलोतांचा पत्ता कट?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.