Akasa Air: आकासा एअर 150 बोईंग 737 मॅक्स विमानांची करणार खरेदी; काय आहे प्लॅन?

Boeing bags 150 MAX planes order from India's Akasa Air : भारताची नवीन एअरलाइन Akasa Airने 150 Boeing 737 Max विमानांची ऑर्डर दिली आहे. देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारात नवीन विमान मार्ग सुरू करण्यासाठी तसेच एअरलाइनचा विस्तार करण्यासाठी या विमानांचा वापर केला जाणार आहे.
Akasa Air orders 150 Boeing 737 MAX aircraft for expanding operations
Akasa Air orders 150 Boeing 737 MAX aircraft for expanding operations Sakal
Updated on

Akasa Air: भारताची नवीन एअरलाइन Akasa Airने 150 Boeing 737 Max विमानांची ऑर्डर दिली आहे. देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारात नवीन विमान मार्ग सुरू करण्यासाठी तसेच एअरलाइनचा विस्तार करण्यासाठी या विमानांचा वापर केला जाणार आहे. दिवंगत राकेश झुनझुनवाला यांच्या कुटुंबाचा पाठिंबा असलेल्या या विमान कंपनीने यापूर्वी 76 बोईंग 737 मॅक्स विमानांची ऑर्डर दिली होती.

हैदराबादमध्ये आयोजित आशियातील सर्वात मोठ्या इव्हेंट विंग्स इंडिया एअर शोमध्ये एअरलाइनने ही घोषणा केली आहे. आकासा एअरने सांगितले की, ऑपरेशन सुरू केल्याच्या 17 महिन्यांत 200 हून अधिक विमानांची ऑर्डर बुक मिळवणारी ही एकमेव भारतीय विमान कंपनी आहे.

Akasa Air orders 150 Boeing 737 MAX aircraft for expanding operations
Aadhaar Card: EPFOने घेतला मोठा निर्णय; आधार क्रमांक यापुढे जन्मतारखेचा पुरावा मानला जाणार नाही

"नवीन ऑर्डरमध्ये 737 MAX 10 आणि 737 MAX 8-200 जेट्सचा समावेश आहे. यामुळे कंपनीचा देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विस्तार वाढणार आहे," असे एअरलाइनने म्हटले आहे.(The domestic & international expansion of the company will increase)

आकासा एअरचे सीईओ विनय दुबे, हैदराबादमधील विंग्स 2024 एअर शोमध्ये म्हणाले, “या मोठ्या आणि ऐतिहासिक विमान ऑर्डरमुळे आम्हाला या दशकाच्या अखेरीस जगातील टॉप-30 आघाडीच्या एअरलाइन्सपैकी एक होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.”

Akasa Air orders 150 Boeing 737 MAX aircraft for expanding operations
RBI: विकासदर सात टक्के राहण्याची शक्यता; RBI गव्हर्नर शक्तिकांत दास यांचे दावोस येथे प्रतिपादन

जून 2023 मध्ये चार बोईंग 737 मॅक्स 8 विमानांची ऑर्डर देण्यात आली होती. आठ वर्षांत एकूण 204 विमानांची डिलिव्हरी करणार असल्याचे एअरलाइनने म्हटले आहे.

हवाई प्रवासाच्या वाढत्या मागणीमुळे 2023 मध्ये व्यावसायिक जेट ऑर्डर्सने विक्रमी पातळी गाठली. भारताच्या इंडिगो एअरलाईनने जूनमध्ये 500 जेटची ऑर्डर दिली (IndiGo Airlines orders 500 jets in June), ज्याची किंमत अंदाजे 55 अब्ज डॉलर आहे. काही महिन्यांपूर्वी एअर इंडियाने 470 जेटची ऑर्डरही दिली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.