Akshaya Tritiya 2023: अक्षय्य तृतीयेला सोने खरेदीची तयारी करत असाल तर घरातून बाहेर पडण्यापूर्वी ऑफर्स कुठे चालू आहेत ते तपासा. सोन्यावर कुठे आणि किती सूट दिली जात आहे, हे जाणून घ्या. तुम्हाला सोने, चांदी आणि हिरे यांच्या खरेदीवर 5,000 रुपयांपर्यंत सूट मिळत आहे.
सोन्याच्या खरेदीवर SBI ग्राहकांना मोठ्या प्रमाणात सूट देत आहे. ही ऑफर खास अक्षय्य तृतीयेसाठी आहे. या सणाला अधिक खास बनवण्यासाठी बँकेने खास ऑफर आणली आहे. SBI ग्राहकांना सोने खरेदीवर 5,000 रुपयांपर्यंत सूट मिळत आहे.
अक्षय तृतीयेला SBI आपल्या ग्राहकांना सोने खरेदीवर मोठ्या प्रमाणात सूट देत आहे. आज तुम्ही तनिष्क स्टोअरमधून सोने खरेदी केल्यास तुम्हाला 4,000 रुपयांपर्यंत सूट मिळेल. मात्र, यामध्येही अटी लागू आहेत.
अटीनुसार, तुम्हाला किमान 80 हजार रुपयांची खरेदी करावी लागेल. दुसरे म्हणजे तुम्हाला एसबीआय कार्डद्वारे पेमेंट करावे लागेल. 30 एप्रिलपर्यंत तुम्ही या ऑफरचा लाभ घेऊ शकता.
तुम्ही रिलायन्स ज्वेलर्सच्या वेबसाइट किंवा अॅपवरून 25,000 रुपयांपर्यंतचे सोने खरेदी केल्यास आणि पेमेंटसाठी एसबीआय कार्ड वापरल्यास, तुम्हाला 2,500 रुपयांपर्यंतचा कॅश बॅक मिळेल.
तुम्ही Joyalukkas येथे रु. 30,000 पर्यंत खरेदी केल्यास आणि SBI कार्डने पैसे भरल्यास, तुम्हाला रु. 2,500 पर्यंत कॅशबॅक मिळेल.
जर तुम्ही GRT ज्वेलर्समधून किमान 25 हजारांची खरेदी केली आणि SBI कार्डने पेमेंट केले तर तुम्हाला 2,500 रुपयांपर्यंत सूट मिळेल.
तुम्ही त्रिभुवनदास भीमजी झवेरी येथे रु. 1 लाखांपर्यंत खरेदी केल्यास आणि SBI कार्डने पैसे भरल्यास तुम्हाला रु. 5,000 पर्यंत सूट मिळते. जर तुम्ही 50 हजार रुपयांपर्यंत खरेदी करत असाल तर तुम्हाला 2,500 रुपयांचा कॅशबॅक मिळेल.
तुम्ही पीपी ज्वेलर्समध्ये खरेदी केल्यास आणि SBI कार्डने पैसे भरल्यास, तुम्हाला हिऱ्यांच्या दागिन्यांवर 30% पर्यंत सूट मिळेल.
जर तुम्ही मणप्पुरम गोल्डमधून सोने किंवा हिऱ्याची खरेदी केली तर तुम्हाला हिऱ्यावर प्रति कॅरेट 15,000 रुपये सूट मिळते. दुसरीकडे, 1 लाख रुपयांपर्यंतचे सोन्याचे दागिने खरेदी करण्यासाठी 100 मिलीग्राम सोन्याचे नाणे फ्री मिळत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.