Akshaya Tritiya 2024 : पुण्यात यंदा ६ हजार नवीन वाहनांची खरेदी; दुचाकी सुसाट

अक्षय्य तृतीयेच्या पार्श्वभूमीवर पुण्यात सहा हजार २०४ नवीन वाहनांची खरेदी झाली आहे.
akshaya tritiya Purchase of 6 thousand new vehicles in Pune this year Two and four wheeler auto sector
akshaya tritiya Purchase of 6 thousand new vehicles in Pune this year Two and four wheeler auto sectorSakal
Updated on

Pune News : अक्षय्य तृतीयेच्या पार्श्वभूमीवर पुण्यात सहा हजार २०४ नवीन वाहनांची खरेदी झाली आहे. यात सर्वात जास्त खरेदी दुचाकींची झाली आहे. अवघ्या नऊ दिवसांत चार हजार २७० दुचाकीची नोंद झाली आहे. मागील वर्षाच्या तुलनेत वाहनांची खरेदी यंदा मात्र कमी झाली. इलेक्ट्रिक वाहनांना देखील यंदा काहीसा कमी प्रतिसाद लाभलेला आहे.

साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या या मुहूर्ताला वाहनांची खरेदी मोठ्या प्रमाणात होते. काही जण जुन्या वाहनांची देखील खरेदी करतात. अनेकांना अक्षय्य तृतीयेच्या दिवशी वाहन घ्यायचे असल्याने अनेक जण आधीच वाहन बुक करून ठेवतात. एक ते नऊ मे दरम्यान पुण्यात सहा हजार २०४ नवीन वाहनांची खरेदी झाली आहे.

मागील वर्षीच्या तुलनेत काही प्रमाणात वाहन खरेदीत घट झाली आहे. मागच्या वर्षी अक्षय्य तृतीयेच्या पार्श्वभूमीवर १३ ते २२ एप्रिल दरम्यान सात हजार ९०२ वाहनांची खरेदी झाली होती. त्यावेळी दुचाकीची संख्या चार हजार ९१२ इतकी होती. यंदाच्या वर्षी ३९० इलेक्ट्रिक वाहनांची खरेदी झाली आहे. मागच्या वर्षी ही संख्या ७१८ इतकी होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.